हत्तीबेटावर श्री. स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
उदगीर–उदगीर-देवणी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या देवर्जन गावाजवळील हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या डोंगरावर श्री. स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड व त्यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई राठोड यांच्या हस्ते व ढालगांव (जि. सांगली)येथील स्वामी समर्थांचे शिष्य प. पूज्य काशीनाथ नारकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी करण्यात आली.शनिवारी सायंकाळी या मूर्तीचे पूजन उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी सकाळी या मूर्तीची विधिवत पूजा करून मुख्याधिकारी भारत राठोड व सुमनताई राठोड यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी प. पु. काशीनाथ नारकर महाराज यांनी सकारात्मक जगायला शिकलो तर जीवन सफल होईल,अडचणीवर मात करण्यासाठी शक्ती येईल. संघर्ष पेलण्याची ताकद मिळेल जगणे सुंदर होईल हा संदेश नारकर महाराजांनी उपस्थित भक्तांना दिला.
प्रारंभी व्ही. एस. कुलकर्णी व गंगाधर गोसावी यांनी पाहुण्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. या कार्यक्रमास हैद्राबादचे निवृत्त प्राचार्य सुरेश कुलकर्णी, जि. प. चे कृषी व पशु संवर्धन सभापती गोविंदराव चिलगुरे,उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पो. नि. गोरख दिवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मयूर कुलकर्णी, सुनंदा सरदार,भालचंद्र कुडलीकर, स्नेहा कुडलीकर,संदीप कुलकर्णी,राम भोसले, विठ्ठल सूर्यवंशी ,विष्णू संपते,राम बोंबिले,सचिन सूर्यवंशी,गणेश चव्हाण,बाबू राठोड,संदीप सूर्यवंशी, श्रीधर नेलवाडे यांनी पुढाकार घेतला.