26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसांस्कृतिक*स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवामध्ये दयानंदचा पुन्हा दबदबा*

*स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवामध्ये दयानंदचा पुन्हा दबदबा*

◆दयानंद कला महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद
तर दयानंद वाणिज्य महाविद्यालयाला सर्वसाधारण उपविजेतेपद
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड आणि दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद कला महाविद्यालय,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.12 ते 15 ऑक्टोंबर 2023 या दरम्यान आंतर महाविद्यालयीन ज्ञानतीर्थ- 2023 युवक महोत्सव मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाला. या महोत्सवात सर्वसाधारणपद दयानंद कला महाविद्यालय,लातूर यांनी तर सर्वसाधारण उपविजेतेपद दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर यांनी प्राप्त करुन दयानंदचा दबदबा कायम ठेवला.


            या युवक महोत्सवासाचे बक्षीस वितरण सुप्रसिध्द सिनेअभिनेते आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम  समीर चौघुले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, कोरोना काळात खऱ्या अर्थाने कलावंताला त्याच्या कलेनेच जगविले. हास्य जत्रेने केवळ कलावंत घडविला नसून घराघरातील सदस्य घडविला. मी अनेक वेळा हरलो आणि याच हरण्यातून पुन्हा उभा राहीलो. या महोत्सवातून मी कलावंताच्या कलेची स्फूर्ती आणि ऊर्जा घेऊन जात आहे. सादर झालेले कलाप्रकार थेट मनात घुसले. अपयश आल्यानंतर फिनीक्स पक्षाप्रमाणे राखेतून उडायला शिकले पाहिजे.


            या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घूगे यांची प्रमुख उपस्थिती होती. मनोगतात त्या म्हणाल्या की, कलावंताचा जोश युवक महोत्सवात होता. चार दिवस टिकण्यापेक्षा तो 365 दिवस कायम राहिला तर कलावंताचे करिअर घडते. तरुणपणात आपण कोणावरही विसंबून नसतो. कला सादरीकरणासाठी जीव ओतावा लागतो,  खूप मेहनत घ्यावी लागते. याचे प्रत्यंतर अनेक नट-नटीचे  पूर्वायुष्य पाहिल्यास लक्ष्यात येते. वरवर पाहता ते सुंदर दिसते. परंतु त्या मागची मेहनत आणि तपश्चर्या दिसत नाही.
            विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना हा युवक महोत्सव खूप अविस्मरणीय आणि यशस्वी झाला. असे जाहिर केले. महोत्सवातील कलाप्रकारांचे सादरीकरण पाहताना ते प्रत्यक्ष टी.व्ही. वर पाहिलयासारखे वाटत होते.  ज्या परिसरात कौशल्य, श्रध्दा आणि कष्ट करण्याची जिद्द आहे अशा परिसराचा कुलगुरु असल्याचा मला अभिमान आहे. या महोत्सवाने आदर्श निर्माण करुन महोत्सव कसा असावा याची उंची गाठली आहे. दयानंद क्लस्टर युनिव्हर्सिटी झाली तर ती राज्यातच नव्हे तर देशात आदर्श असेल.  शेवटी त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय युवक महोत्सवात कलावंतांकडून किमान 15 पारितोषिके प्राप्त करण्याची आपेक्षा व्यक्त केली.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले. ते म्हणाले की, कलंदर कलावंताना आकृष्ट करणारा युवक महोत्सव संपन्न झाला. शिस्त, भोजनव्यवस्था, प्रवासव्यवस्था, निवासव्यवस्था याचा आदर्श दयानंद शिक्षण संस्थेने घालून दिला. या युवक महोत्सवातील पाचही मंचांवर कलावंत स्वता:ला घडवत होता. सहभागी विद्यार्थिनी कलावंताना लेकीप्रमाणे माया लावणारी ही संस्था आहे.
            संस्था सचिव रमेश बियाणी यांनीही युवक महोत्सवाचे कौतूक केले. ते म्हणाले की, आजच्या मोबाईलच्या जगात कलावंत, विद्यार्थी मोबाईल न चाळता कलेमध्ये दंग होतात. कला किती श्रेष्ठ असते याचा हा नमूना आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण हसणे आणि हसविणे विसरत चाललो आहोत. अशा काळात केवळ कलाच आपणास जीवनाचा आनंद देऊ शकते. शिक्षणातून आनंद देण्याचे काम कलाच करीत असते. शेवटी त्यांनी संस्थेचे भव्य कलादालन सुरु करण्याचा मानस व्यक्त केला.


            याप्रसंगी दोन सहभागी कलावंतानी मनोगत व्यक्त केले. कु. क्रांती कोटलवार या विद्यार्थिनीने तर ‘दयानंद शिक्षण संस्थेने विद्यार्थिनींची केलेली निवास व्यवस्था इतकी उत्तम होती की, आम्हा विद्यार्थिनींना दयानदं हक्काचे माहेर घर वाटले.
            या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, विद्यापीठ विकास मंडळाचे सर्व सन्माननीय सल्लागार सदस्य, सिनेट सदस्य उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या प्रारंभी दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य क. हे. पुरोहित यांना श्रध्दांजली वाहन्यात आली. दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य              डॉ. शिवाजी गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली.
 या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवातील पारितोषिके पुढील प्रमाणे  शोभायात्रा : प्रथम – ग्रामीण सायन्स (व्होकेशनल) कॉलेज, विष्णुपुरी, नांदेड. द्वितीय : (विभागून)  दयानंद कला महाविद्यालय, लातूर  आणि श्री. मधुकरराव पाटील खतगावकर कॉलेज शंकरनगर जि. नांदेड, तृतीय: (विभागून)  श्री. शिवाजी महाविद्यालय, कंधार जि. नांदेड आणि संभाजीराव केंद्रे महाविद्यालय,जळकोट, जि. लातूर


शास्त्रीय नृत्य (वैयक्तिक) : प्रथम-दयानंद कला महाविद्यालय, लातूर द्वितीय:  जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर, तृतीय: (विभागून) एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, नांदेड आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.
लोकनृत्य (सांघिक) प्रथम- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, द्वितीय (विभागून) एम.जी.एम. कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, नांदेड  आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर, तृतीय : (विभागून)  जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर.
 आदिवासी नृत्य (सांघिक): प्रथम प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड, द्वितीय बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट जि. नांदेड. तृतीय-  सरस्वती महाविद्यालय, किनवट
 नक्कल (वैयक्तिक): प्रथम-  दयानंद कला महाविद्यालय, लातूर द्वितीय – दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, तृतीय(विभागून):  स्वा.रा.ती.म.विद्यापीठ परिसर, नांदेड आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.
 मूक अभिनय (सांघिक) : प्रथम- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड, द्वितीय – जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर, तृतीय-  महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर
विडंबन (उपरोधिक अभिनय)/ स्कीट (सांघिक): प्रथम- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर,द्वितीय – दयानंद कला महाविद्यालय, लातूर, तृतीय-  राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.
उत्कृष्ट अभिनय (पुरुष) (वैयक्तिक) प्रथम- पीपल्स कॉलेज, नांदेड – सतीश भगत    ( एकांकिचे नांव-गटार, पात्र – बाबा),द्वितीय – राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.- रुतू सुरवसे  ( एकांकिचे नांव-सहल, पात्र – पप्पा), तृतीय-  दयानंद विधी महाविद्यालय, लातूर – सोहफ सय्यद ( एकांकिचे नांव-कतार, पात्र – युवक)
 उत्कृष्ट अभिनय (स्त्री) (वैयक्तिक): प्रथम- महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर- वैष्णवी कांबळे – एका स्वप्नगर्भाचा मृत्यू- सुंद्री, द्वितीय – दयानंद कला महाविद्यालय, लातूर – प्रतीक्षा पाटणकर- बिराड- माय, तृतीय-  – नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड –आदिती केंद्रे- बवाल- दुर्वा
  एकांकिका  (सांघिक) : प्रथम- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड –बवाल
 द्वितीय – महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर- एका स्वप्नगर्भाचा मृत्यू, तृतीय-  – राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.- सहल.
 उत्कृष्ठ दिग्दर्शक (वैयक्तिक) प्रथम-नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड –कृष्णा कोमटवार (बवाल), द्वितीय – दयानंद कला महाविद्यालय, लातूर – विजय मस्के- बिऱ्हाड तृतीय-  – राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.- अनिल कांबळे- सहल.
  जलसा  (सांघिक) प्रथम-दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर,  द्वितीय – श्री. शिवाजी महाविद्यालय, कंधार जि. नांदेड तृतीय-  – जयक्रांती महाविद्यालय, लातूर.
लोकसंगीत  (फोकऑर्केस्ट्रा)  (सांघिक) प्रथम-  स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड.
 द्वितीय – महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर. तृतीय-  – दयानंद कला महाविद्यालय, लातूर
लावणी  (सांघिक) प्रथम-     दयानंद कला महाविद्यालय, लातूर  द्वितीय (विभागून):.नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड आणि जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर. तृतीय-  (विभागून) इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी विष्णुपूरी, नांदेड  आणि जयक्रांती अध्यापक महाविद्यालय, लातूर.
पोवाडा (सांघिक) : प्रथम- दयानंद विधी महाविद्यालय, लातूर, द्वितीय – दयानंद कला महाविद्यालय, लातूर तृतीय-  दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर
 कव्वाली (सांघिक) प्रथम-  दयानंद कला महाविद्यालय, लातूर, द्वितीय – महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर, तृतीय-  – स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड.
 समूहगायन पाश्चात्य (सांघिक) प्रथम- दयानंद कला महाविद्यालय, लातूर,  द्वितीय – दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, तृतीय  (विभागून): नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड आणि स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड.
 समूहगायन भारतीय (सांघिक) प्रथम- राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर,  द्वितीय (विभागून) : स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर तृतीय (विभागून)  दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर आणि कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी.
 सुगमगायन पाश्चात्य (वैयक्तीक): प्रथम- जयक्रांती अध्यापक महाविद्यालय, लातूर  द्वितीय – राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर, तृतीय  (विभागून) :दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर              आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड
 सुगम गायन भारतीय (वैयक्तीक) प्रथम-  सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूर  द्वितीय – नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड, तृतीय  – स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड.
 शास्त्रीय सुरवाद्य (वैयक्तीक) : प्रथम-स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड. द्वितीय – गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रीकी महाविद्यालय, विष्णुपूरी,नांदेड, तृतीय  –  दयानंद कला महाविद्यालय, लातूर  .
 शास्त्रीय तालवाद्य (वैयक्तीक) : प्रथम-स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड.  द्वितीय – महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर, तृतीय  –  राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
 शास्त्रीय गायन (वैयक्तीक) : प्रथम(विभागून) शिवाजी महाविद्यालय, परभणी आणि  गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रीकी महाविद्यालय, विष्णुपूरी,नांदेड, द्वितीय (विभागून): दयानंद कला महाविद्यालय, लातूर आणि श्री. शिवाजी महाविद्यालय, कंधार जि. नांदेड, तृतीय (विभागून)  सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूर आणि स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड.
कथाकथन (वैयक्तीक) : प्रथम- संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय (कॉक्सीट), लातूर  ,  द्वितीय (विभागून) दयानंद कला महाविद्यालय, लातूर आणि दयानंद विधी महाविद्यालय, लातूर तृतीय – नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड.
 वक्तृत्व (वैयक्तीक) : प्रथम-  जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर  ,  द्वितीय – संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय (कॉक्सीट), लातूर तृतीय  (विभागून) : दयानंद विधी महाविद्यालय, लातूर आणि श्री. शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी.
वादविवाद (सांघिक): प्रथम- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड,  द्वितीय – श्री. शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी. तृतीय  (विभागून) : पीपल्स कॉलेज, नांदेड आणि दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर.
मेहंदी (वैयक्तिक) : प्रथम-   दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर.  द्वितीय – ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी. तृतीय  – श्री. शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी
 कलात्मक जुळवणी (इंस्टॉलेशन) (सांघिक) :प्रथम- लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद, जि. नांदेड.  द्वितीय – श्री. शिवाजी महाविद्यालय, कंधार जि. नांदेड, तृतीय  – श्री. मधुकरराव पाटील खतगावकर कॉलेज शंकरनगर जि. नांदेड.
स्थळ छायाचित्रण (वैयक्तिक) प्रथम-   श्री. शिवाजी महाविद्यालय, कंधार जि. नांदेड,  द्वितीय – शारदा महाविद्यालय, परभणी, तृतीय  – तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव.
 रांगोळी (वैयक्तिक) : प्रथम-   दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर,  द्वितीय – श्री. शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी तृतीय  – स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, परिसर, नांदेड.
व्यंगचित्रकला (वैयक्तिक) : प्रथम-  आदर्श महाविद्यालय, हिंगोली ,  द्वितीय – राजीव गांधी महाविद्यालय, मुद्खेड, तृतीय  – दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर.
मृदमूर्तिकला (वैयक्तिक) : प्रथम-  दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर,  द्वितीय – श्री. शिवाजी महाविद्यालय, कंधार जि. नांदेड, तृतीय  – एम.जी.एम. कॉलेज ऑफ कंम्प्युटर सायन्स, नांदेड.
 पोस्टर मेकिंग (वैयक्तिक): प्रथम-   लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद, जि. नांदेड.
 द्वितीय – आदर्श महाविद्यालय, हिंगोली, तृतीय  – नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड.
 कोलाज (वैयक्तिक) : प्रथम-   नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड.,  द्वितीय – श्री. शिवाजी महाविद्यालय, परभणी,  तृतीय  – शारदा महाविद्यालय, परभणी
 चित्रकला (वैयक्तिक) : प्रथम-   आदर्श महाविद्यालय, हिंगोली, द्वितीय – श्री. शिवाजी महाविद्यालय, परभणी, तृतीय  – पीपल्स कॉलेज, नांदेड.
———————————————————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]