लातूर : श्री गुरूजी आयटीआय मध्ये वर्षभर विद्यार्थ्यांचे वाढदिवस विद्यार्थीच वृक्षारोपन करून साजरे करणार आहेत. या वृक्षारोपणा साठी शंभर पेक्षा जास्त कुंड्या वापरल्या जाणार आहेत. या कुंड्या मध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणापूर्वीचे काळी माती भरण्याचे श्रमदान केले. अशा प्रकारे पर्यावरणाला पुरक उपक्रम राबवत श्री गुरूजी आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने वीर सावरकर जयंती साजरी केली.
संपूर्ण भारतभर यावेळी सावरकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. तसेच लातूर मध्ये तंत्र शिक्षणासाठी समर्पित असलेल्या श्री जानाई प्रतिष्ठान संचलित श्री गुरूजी आय टी आय मध्ये वेगळ्या प्रकारे सावरकर जयंती साजरी करण्यात आली.वृक्षारोपण त्याचे संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग घेत त्यांच्याकडून श्रमदान करून घेत शंभर पेक्षा जास्त कुंड्यात काळी माती भरून घेण्यात आली. या कुंड्यात विद्यार्थ्यांच्या वाढदिवसा दिवशी वृक्षारोपण केले जाणार आहे.तोच विद्यार्थी त्या वृक्षाचे संवर्धन करणार आहे.वृक्षारोपणातून पर्यावरण सवर्धन हा विचार विद्यार्थ्यां मध्ये श्रमदानातून व सहभागातून सावरकर जयंती दिन संक्रमीत करण्यात आला.
यासाठी ड्राईंगचे शिक्षक पी व्ही देशमुख सरांनी पुढाकार घेतला. जी टी जोशी, समर्थ पिंपळे, अजय होलगे, गुर्लेसर ,बाबा डोंगरेसर, विकास घोडके यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.प्रिंट लाईन ऑफसेटचे श्री दिलीप कुलकर्णी यांनी वृक्षारोपण साठी लागणा-या कुंड्या संस्थेला भेट दिल्या आहेत.