18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeशैक्षणिक*स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी*

*स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी*

कुलपती तथा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना
स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची कृती समितीची मागणी , विद्यापीठ निर्मितीसाठी राज्यपाल महोदय सकारात्मक

लातूर दि.२०.०८.२०२२ रोजी लातूरकर विद्यापीठ निर्माण कृति समिति लातूरच्या वतिने राज्याचे राज्यपाल तथा कुलपती मा भगतसिंह कोश्यारी यांना शिष्टमंडळाद्वारे लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचीं मागणी करण्यात आली आहे.

लातूरचे सुपुत्र लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून २००७ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड उपकेंद्र पेठ लातुर येथे सुरु करण्यात आले आहलातुर जिल्हयातंर्गत कला, वाणिज्य, विज्ञान ,औषधनिर्माण शास्त्र, विधी, अभियांत्रिकी, वैद्यकीय अनुदानित ३६ महाविद्यालय,कायम विनाअनुदानित ८० असे एकूण ११६ महाविद्यालय आहेत व त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या ५५,४१०आहे ,या प्रशासकीय शैक्षणिक कामाचे स्वरूप लक्षात घेता महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालकांना नांदेडला पायपीठ करावी लागते आहे तर शेजारच्या सोलापूर जिल्हयासाठी महाविद्यालयांची संख्या १०९असताना विद्यार्थी, पालक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी २०१४ मध्ये स्वतंत्र विद्यापीठ शासनाने दिलेले आहे.


लातुर जिल्हाची शिक्षणातील भरारी पाहता लातूर पॅटर्न राज्यात व देशात सर्वदूर परिचीत आहे.आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने लातूरला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी शासन दरबारी वेळोवेळी लावून धरलेली आहे, विद्यार्थ्याच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी लातुरला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी सातत्याने करीत आहोत
राज्याचे माजी मंत्री वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री आ अमित विलासराव देशमुख, राष्ट्र्वादीचे नेते तथा माजी मंत्री आ संजय बनसोडे यांनी ही उपकेंद्राच्या शैक्षणिक कामकाजात ठराविक मर्यादा असल्यामुळे स्थानिक पातळीवर निर्माण होणारी शैक्षणिक व प्रशासकीय गैरसोय टाळण्यासाठी लातुर येथे स्वतंत्र विद्यापीठ करणे बाबत सहानुभूती पूर्वक विचार व्हावा अशा आशयाचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री मा ना उद्धव ठाकरे , मा ना उदय सामंत ,उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य यांना दिलेले आहे तर
मा सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग नांदेड व कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे शिफारस अहवालावरून लातुर येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्या बाबत विद्यापीठ कायदा २०१६ अंतर्गत कलम ३(२)नुसार शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही होणे गरजेचे असल्याचा अहवाल श्री डॉ धनराज माने, शिक्षण संचालक,उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी दि.१५.९.२०२० च्या पत्रांनव्ये अप्पर मुख्य सचिव,उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांना अहवाल सादर केलेला आहे,त्यामुळे निकषांवर लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन होने गरजेचे व अत्याआवश्यक आहे.याबाबत राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार यांना ही दि.४ मार्च २०२२ रोजी प्रत्यक्ष भेटुन निवेदनाद्वारे अवगत केलेले आहे.


याची माहिती मुख्य संयोजक अँड प्रदिपसिंह गंगणे यानी मा ना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली आहे यावेळी राज्यपाल महोदय यांनी सकारात्मकता दर्शवत लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय मदत करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे यावेळी मुख्य संयोजक अँड प्रदिपसिंह गंगणे, धनराज जोशी, ताहेरभाई सौदागर उपस्थित होते तर निवेदनावर डॉ अंबादास कारेपुरकर, बालाजीप्पा पिंपळे, प्रा संगमेश्वर पांनगावे, अँड गोपाळ बुरबुरे, अँड अमितकुमार कोथमीरे,जमालोद्दीन मणियार, अँड अभिजित मगर, अँड आश्विन जाधव,सुनील खडबडे, महेश विजापूरे, भिमराव दूनगावे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]