26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*स्वच्छतेचे कंत्राट रद्द करण्यासाठी अजित पाटील कव्हेकरांचे उपोषण*

*स्वच्छतेचे कंत्राट रद्द करण्यासाठी अजित पाटील कव्हेकरांचे उपोषण*

स्वच्छतेचे कंत्राट रद्द करण्याचे आश्‍वासन मिळाल्याशिवाय उपोषणातून माघार नाही

  • अजितसिंह पाटील कव्हेकर
    लातूर दि.23-08-2023

    शहरातील स्वच्छतेच्या प्रश्‍नावर लक्ष देऊन स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागावा यासाठी दरवर्षी केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण केले जाते. यामध्ये 2017 मध्ये लातूर महानगरपालिका रँकमध्ये 318 व्या क्रमांकावर होती. 2018 मध्ये भाजपाकडे सत्ता येताच रँक 125 वर आली तर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये लातूर महानगरपालिका रँक 38 व्या क्रमांकावर आली असून सॉलीड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये लातूर शहराचा देशात पहिला क्रमांक आल्याचे समोर आले. त्यानंतर मात्र काँग्रेसची सत्ता व नंतर लातूर महानगरपालिकेवर प्रशासक आल्यामुळे स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असल्याचे समोर आलेले आहे.
  • तरीही लातूर महानगरपालिका याकडे दूर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. लातूर शहरामध्ये शिक्षणाचा लातूर पॅटर्न असल्यामुळे 60 ते 70 हजार विद्यार्थी लातूर शहरामध्ये येतात. त्यांचा शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन शांत, स्वच्छ आणि सूरक्षित शहर असा आहे. परंतु मनपाच्या दूर्लक्षामुळे लातूर शहरातील दूर्गंधी समोर आल्यामुळे लातूरकरांसह या विद्यार्थ्यांच्या आरोग्यांचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे स्वच्छतेचे कंत्राट घेणार्‍या त्या कंत्राटदाराचे कंत्राट तत्काळ रद्द करून लातूरकरांचे स्वच्छ व सुंदर शहराचे स्वप्न साकार करा अन्यथा हे भाजयुमोचे अन्‍नत्याग आमरण उपोषण कायम चालूच राहील असा ईशारा भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना दिला.

  • यावेळी ते शहरातील गांधी चौकात भाजपा युवा मोर्चाच्यावतीने लातूर शहर महानगरपालिका कचरा व्यवस्थापनाच्या निषेधार्त भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सचिव विक्रांतदादा पाटील, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर व राज्याचे माजी कागार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाच्यावतीने आयोजित अन्‍नत्याग आमरण उपोषणात बोलत होते.
    यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, शहर सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अ‍ॅड गणेश गोमचाळे, रवी सुडे, गणेश गवारे, ज्योतीराम चिवडे, महात्मा बसवेश्‍वर मंडळाचे संजय गिर, अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, रविकिरण लवटे, आकाश बजाज, हेमंत जाधव, महिला आघाडीच्या संध्याताई जैन, अ‍ॅड. पुनम पांचाळ, प्रियंका जोगदंड, प्रगती डोळसे, जयश्रीताई भुतेकर, कोमल सावंत, हेमा येळे, आफ्रिन खान, ज्योती मार्कंडेय, रत्नमाला घोडके, गजेंद्र बोकण, सागर घोडके, सुनिल राठी, अ‍ॅड.पंकज देशपांडे, प्रेम मोहिते, राजेश पवार, काका चौगुले, गोरोबा गाडेकर, नगरसेविका रागिणीताई यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी पुढे बोलताना युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर म्हणाले, 2020 ला कचर्‍याच्या प्रश्‍नावर पहिले आंदोलन केले होते. याच कचर्‍याच्या प्रश्‍नावर दोन आंदोलने होऊनही लातूर महानगरपालिकेला जाग आलेली नाही. लातूर शहरचे आ.अमित देशमुख यांना तर लातूर महानगरपलिकेत यायला किंवा लातूरच्या प्रश्‍नावर बोलायलाही वेळ नाही. कोट्यवधी रूपयाचे कचर्‍याचे टेंडर एक संस्थेला देऊनही शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग दिसून येत आहे. ऐन पावळ्यामध्ये कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला असून शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह बालकांनाही डेंग्यूच्या आराजांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कचरायुक्‍त लातूर शहरातील कचरा मुक्‍तीसाठी हे अन्‍नत्याग आमरण उपोषण करण्याची वेळ लातूरकरांवर आलेली आहे. त्यातच पार्कींगची बेशिस्त निर्माण झाल्यामुळे लातूरकरांना जामरच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लातूरच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहनही युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.
    प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गांधी चौकातील महालक्ष्मी मंदिरात महाआरती व महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लातूर महानगरपालिका कचर्‍याच्या प्रश्‍नांच्या निषेधार्त असलेल्या अन्‍नत्याग आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली.
    यावेळी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने ज्योतीराम चिवडे, संजय गिर, रविकिरण लवटे, आकाश बजाज, राहुल भूतडा, सुरेश राठोड, अ‍ॅड गणेश गोमचाळे, रवी सुडे, गणेश गवारे, भाजपा सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, गोरोबा गाडेकर आदींनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी , कार्यकर्ते व लातूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

365 दिवसांपैकी फक्‍त 84 दिवस आमदार लातूरात
शहरातील एक वृत्तवाहिनेले केलेल्या सर्वेक्षणामध्ये लातूर शहर मतदार संघाचे आमदार आ.अमित देशमुख मतदार संघासाठी किती वेळ देतात हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. लातूर शहरामध्ये पार्कींगच्या व्यवस्थेचा व कचर्‍याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झालेला असताना लातूर शहराचे आमदार एकदाही लातूर लातूर महानगरपलिकेकडे फिरकले नाहीत. ज्या मतदार संघातून निवडून आले त्या मतदार संघात 365 दिवसापैकी फक्‍त 84 दिवस त्यांनी मतदार संघासाठी दिले. त्यातही त्यांना लातूरच्या गंभीर प्रश्‍नांबाबत लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. लातूरात जागोजागी कचर्‍याचे ढील साचले असतानाही लातूरचे सांघाय करू असे आश्‍वासन देणार्‍या आमदारांनी लातूर शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम करावे. स्वच्छतेची जबाबदारी दिलेल्या कंत्रादाराला 28 नोटीसा देऊनही स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागत नाही. त्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करून दुसर्‍या होतकरू व्यक्‍तींना द्या तेंव्हाच लातूरच्या स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागेल असे आवाहनही भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना केले.
कचरा प्रश्‍नांने लातूरकरांना वेड लावले – हेमंत जाधव
लातूरचा कचरा प्रश्‍न एवढा गंभीर झालेला असतानाही लातूर महानगरपालिका प्रशासक व शहर मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींना कचरा व जामरचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी वेळ मिळत नाही. वेड चित्रपटाद्वारे मनोरंजन करणार्‍या अभिनेत्याच्या आमदार बंधूच्या मतदार संघात कचर्‍याच्या प्रश्‍नांने सर्वसामान्य नागरिकांना वेड लागण्याची वेळ आली असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी लातूर शहरातील हा प्रश्‍न मार्गी लावावा आणि लातूरकराचे स्वच्छ व सुंदर शहराचे स्वप्न साकार करावे असे आवाहनही हेमंत जाधव यांनी केले.

मनपा शिष्टमंडळाची भेट ; तोडगा मात्र निघेना
भाजपा युवा मोर्चाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या अन्‍नत्याग आमरण उपोषणाची तत्काळ दखल घेऊन मनपाच्या सहाय्यक आयुक्‍त मंजूषा गुरमे, स्वच्छता विभाग प्रमुख आर.जी.पिडगे, स्वच्छता निरीक्षक आक्रम शेख अशा तीन सदस्यीय शिष्टमंडळाने भाजपा युवा नेते अजितसिह पाटील कव्हेकर यांची भेट घेऊन अन्‍नत्याग उपोषण माघार घ्या आपण स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लावू असे तोंडी आश्‍वासन दिले. परंतु भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर व पदाधिकार्‍यांनी मात्र स्वच्छतेच्या कंत्राटदाराचे कंत्राट तत्काळ रद्द करून नवीन टेंडर काढा तेव्हाच स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागेल. मनपाकडे 110 घंटागाड्या व स्वच्छतेची यंत्रणा असताना स्वच्छतेची ढिसाळ यंत्रणा कशासाठी असा प्रश्‍न उपस्थित करीत स्वच्छतेच्या प्रश्‍नांबाबत दोन दिवसात फिडबॅक द्या, त्यानंतर आपण उपोषणाबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे उपस्थित मनपा शिष्टमंडळाला सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]