पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त
लातूर शहर महिला जिल्हा काँग्रेसच्या वतीने सन्मान स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाचा उपक्रमातर्गत
लातूर शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
लातूर प्रतिनिधी : शनिवार दि. १९ मार्च २०२२ :
लातूर महिला काँग्रेसच्या वतीने लातूर शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलाच्या कार्याची दखल घेऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त महीलाच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक व विधायक उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने शनिवार दि. १९ मार्च रोजी दुपारी दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृह येथे तथा लातूर मनपाच्या प्रथम महापौर प्रा. डाँ स्मिता खानापुरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सपना किसवे यांनी पूढाकार घेऊन सन्मान स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाचा उपक्रमा अंतर्गत लातूर शहरातील विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार केला.
लातूर शहरात शिक्षण, वैदयकीय, वृत्तपत्र, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात अनेक महिलाचा वावर आहे. या विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यातून ठसा उमटवीला आहे. यामध्ये डॉ. प्रिती पोहेकर, डॉ सुरेखा काळे, मिरा भारती, मालती गिरी, शिला वाघमारे, सहारा शेख, डॉ. सुनीता पाटील, सुमती जगताप, प्रीतम जाधव, मीना भाले, शाहिदा पठाण, लताबाई रसाळ, जयश्री ठवळे, सुधा वंगे, गंगाबाई कंगले, जयश्री तांदळे, वंदना बांगड, भक्ती पाटील, कल्पना भट्टड, रुपाली बोराडे पाटील, सरोजिनी स्वामी या कृर्तृत्वान महिलांचा “स्त्रीशक्तीच्या कृर्तृत्वाचा”या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा तथा लातूर मनपाच्या प्रथम महापौर प्रा. डाँ स्मिता खानापुरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सपना किसवे, लातुर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड. किरण जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास सर्व महिला काँग्रेस पदाधिकारी व नगरसेविका उपस्थित होत्या पुरस्कार प्राप्त महिलांचे मान्यवरांनी अभिनंदन करून पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
———————