28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसाहित्य*स्त्री – पुरूषांनी एकेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणे आवश्यक : डॉ....

*स्त्री – पुरूषांनी एकेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणे आवश्यक : डॉ. विभा गुप्ता*

*कवयित्री अनुराधा पाटील यांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम संपन्न**एमजीएम मिशनचा सक्षमा पुरस्कार डॉ. विभा गुप्ता यांना प्रदान*
छत्रपती संभाजीनगर, दि. ८ : स्त्री – पुरूषांनी एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांना पूरक राहत समजून घेणे आवश्यक असल्याचे मत आज येथे मगन संग्रहालय समितीच्या अध्यक्षा तथा ज्येष्ठ  गांधीवादी कार्यकर्त्या  डॉ. विभा गुप्ता यांनी व्यक्त केले. 
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम आज महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील रुक्मिणी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी डॉ. विभा गुप्ता यांना श्रीमती अनुराधा कदम, श्रीमती त्रिपाठी, श्रीमती शोभा कक्कड, श्रीमती शिराडकर यांच्या हस्ते मिशनचा यंदाचा ‘सक्षमा पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा झाल्यानंतर प्रा.आश्विनी दाशरथे व प्रा. आरोही शिंदे यांनी श्रीमती  गुप्ता यांची मुलाखत घेतली.

मुलाखतीदरम्यान श्रीमती गुप्ता यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. श्रीमती गुप्ता म्हणाल्या, माझ्या जडणघडणीचे सर्व श्रेय माझ्या आई वडिलांना जाते. जीवनाला पूरक असणारे शिक्षण आजच्या काळामध्ये घेणे गरजेचे आहे. माणसाने मेहनती असणे आवश्यक असून बुद्धिशक्तीसह श्रमशक्ती जपणे आणि ती आपल्या जीवनात उतरवणे ही काळाची गरज आहे. महिलांनी भारत देशाला आपल्यालासारखे बनवत समृद्ध भारत बनविण्यासाठी कार्यशील राहणे काळाची गरज आहे. आपल्याला मातृत्वाच्या भावनेने सगळीकडे पाहता यायला हवे. आपलं स्वतःच असणे जपत तुलना करणे सोडत कायम शिकत राहणे गरजेचे आहे. पुरूषत्वातील  आणि स्त्रीत्वातील चांगल्या गोष्टी स्त्री – पुरूषांनी एकमेकांकडून घेत जीवनाचा प्रवास करावा, असे  मत श्रीमती गुप्ता यांनी यावेळी सांगितले. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका – कवयित्री अनुराधा पाटील यांनी आपल्या कवितांचे यावेळी वाचन केले. त्यांनी ती पान लावते, कदाचित अजूनही, बाई तस तर, हे खरं आहे, नोंद वही इ. कवितांचे वाचन केले. यामध्ये त्यांनी ‘हे खरं आहे…हे खरं आहे स्वतःच्या घरासारखं असत नाही दुसरं घर..पण ऐलतीरावर बसून पैलतीराची खात्री देणाऱ्या आपल्यानीच ते उन्हात बांधलेलं असतं आधीपासून…हेही खरं आहे आज आणि आता याबद्दल शाश्वती नसली तरी सगळे म्हणतात तसं उद्याचं जग तुझे असेलही…पण समजू नकोस नव्या जगाच्या आश्वासक खिडकीमधून तुला डोकावता येईल मुक्त मोकळं सहज कवेत घेता येईल अंगणा बाहेरचं थोडंस आभाळ…’ अशा शब्दांत त्यांनी कविता मांडल्या.

गवाक्ष अंकाच्या प्रकाशनासह यंत्र अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘नॉन डिग्रेडेबल सॅनिटरी वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम’ (अक्षोभ्या) प्रकल्पाचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलपती अंकुशराव कदम, श्रीमती अनुराधा कदम, श्रीमती त्रिपाठी, श्रीमती शोभा कक्कड, श्रीमती डॉ. शिराडकर, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. रेखा शेळके, डॉ.विजया मुसांडे, श्रीमती प्रेरणा दळवी, सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शहनाज बासमेह, व आरती साळुंखे यांनी तर आभार प्रदर्शन मानव संसाधन विभागाच्या संचालिका श्रीमती टीना सहरान यांनी मानले.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]