लातूर दि. २३.–
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी सौ उषा हनुमंत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.
येणा-या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सौ उषा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लातूर तालुक्यातील महिलांचे संघटन मजबूत होऊन निश्चितपणे भाजपाचे काम वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करुन आ. रमेशआप्पा कराड यांनी यावेळी सौ. शिंदे यांना नियुक्तीपत्र देवून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, तालुका सरचिटणीस अनंत कणसे, पांडुरंग गडदे, मुरुड शहराध्यक्ष वैभव सापसोड, ललिता कांबळे, लता भोसले, मिराताई शिंदे, भैरवनाथ पिसाळ, अशोक सावंत, श्रीमंत शिंदे, गोविंद मुंडे, पांडुरंग शिंदे, विशाल कणसे, यांच्यासह अनेक जण होते.