एक शेतकरी घेवू शकतो मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सर्व योजना – आ. अभिमन्यू पवार.
निलंगा,-( प्रतिनिधी )-
शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मनरेगा योजनेतील वैयक्तिक लाभाच्या सर्वच योजना एका शेतकर्याला घेता येवू शकतात शंभर टक्के अनुदानाच्या या योजना दुर्दैवाने गेल्या वीस ते पंचवीस वर्षात कुठल्याही राज्यकर्त्यांनी सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या नाहीत.या योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीच्या असून यासाठी केंद्र सरकारने भरीव निधीची तरतूद केल्याचे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी निलंगा तालुक्यातील माळेगाव (कल्याणी) व कलमुंगळी येथे दि.७ मे रोजी मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियाना निमित्त शेतकऱ्यांशी बोलताना केले आहे.
यावेळी ओम बिराजदार, लाला शेख, नितिन पाटील, श्रीहरी जाधव,भाजप कासारसिरसी मंडळाच्या महिला अध्यक्षा कल्पना ढविले, तालुका कृषी अधिकारी श्रीनिवास काळे, श्रीमंत मोरे,बालाजी बिराजदार, प्रशांत गुंडे, सरपंच सरस्वती उगडे, उपसरपंच बळीराम मिरकले, दिपक ढविले, अनिल शिंदे, गणपती किनगे, किसनराव पाटील, दत्ता पोस्ते, विष्णु शिंदे, मिलिंद होगाडे, राजेंद्र नारायणपुरे, परमेश्वर मगे, अशोक ढविले,सरपंच राजेंद्र सुर्यवंशी, उपसरपंच सतिश मुळे, किसन पाटील, अभय तांबोळी, मारुती पाटील,मैनुद्दीन पटेल, रमेश अवले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की शेतकऱ्यांनी मनरेगा च्या योजनेतून फळबाग लागवडीतून शाश्वत उत्पन्न, शेततळे च्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय, गांडूळ व कंपोस्ट खत योजनेतून कृत्रिम खत तर गोठा योजनेतून सुरक्षित जनावरांना आसरा यासह २७ विविध योजनेतून शंभर टक्के अनुदानीत योजनेचा फायदा घेणे आवश्यक आहे.या योजनेसाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ८० हजार कोटींची तरतूद केली आहे.विशेषता या सर्व योजना एकाच सातबारावर एकाच शेतकऱ्यांना घेता येवू शकतात यामुळे कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चमूसह आपण या अभियानातून मतदारसंघातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत.
शेतकऱ्यांच्या शेताला शेतरस्ते असले पाहिजेत शेत तिथे शेतरस्ते या अभियानातून संपूर्ण मतदारसंघात सुरू असलेल्या या अभियानाच्या माध्यमातून सोळा महिन्यात ८८५ शेतरस्त्यांचे कामे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यात आमदारांना औशाच्या शेतरस्ते अभियानाची उत्सुकता आहे.मतदार संघातील प्रत्येक शेतकरी शेतरस्त्यांसी जोडला जावा जेणेकरून रास वेळेवर झाली पाहिजे, माल वेळेवर विकला पाहिजे व शेतकऱ्यांच्या खिशात वेळेवर पैसा आला पाहिजे हा या अभियानाचा उद्दिष्ट आहे. यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध असून आपली तिजोरी या कामासाठी खुली असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगून शेतरस्ते हे अभियान १ मे २०२३ पर्यंत राबविले जाणार या अगोदर शेतकऱ्यांनी शेतरस्ते तयार करून घ्यावे १ मे नंतर मात्र आपण वीज अभियान हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतरस्ते अभियानाची जन्म माळेगाव कल्याणी च्या घटनेमुळे..
यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या शेतरस्ते अभियानाचा जन्म कल्याणी माळेगाव येथील सोयाबीन बनीम जळाल्याच्या घटनेमधुन झाली आहे.भविष्यात आशा घटना घडू नये यासाठी या अभियानाचा जन्म झाला असून या अभियानासाठी अधिकारी चांगले काम करीत आहेत. शेतकऱ्यांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.