स्वागताध्यक्ष आ. रमेशप्पा कराड, ईश्वर बाहेती व प्रदीप खंडापूरकर शहर व ग्रामीण चे अध्यक्ष
……………………………….
यंदापासून प्रथमच शहर व ग्रामीण विभाग कार्यान्वित
………………………………
लातूर — पन्नास वर्षांची दैदिप्यमान परंपरा असलेल्या लातूरवासियांच्या सामुदायिक दसरा महोत्सवाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून , यंदाच्या या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्वागताध्यक्षपदी आ.रमेशअप्पा कराड यांची एका व्यापक बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.
महोत्सवाच्या शहराध्यक्षपदी ईश्वरचंद्र बाहेती यांचा, तर ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून प्रदीप पाटील खंडापूरकर यांची या बैठकीत टाळ्यांच्या गजरात एकमताने निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वैजनाथप्पा लातुरे होते.

यंदाच्या महोत्सवाचे आगळेवेगळे व अभिमानास्पद वैशिष्ट्य म्हणजे महोत्सवाच्या समितीतील काहीजणांचे मतभेद एकमेकांच्या सामंजस्याने मिटले असून सर्वांनीच एकत्रित येऊन लातूर शहराची सामूहिक दसरा साजरा करण्याची परंपरा पूर्वापार जल्लोषात जपण्याचा संकल्प केला.
महोत्सवाच्या कार्याध्यक्ष पदी प्रकाश पाटील वांजरखेडकर व जयंतराव काथवटे यांची, तर मुख्य संयोजक म्हणून वीर योद्धा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत रांजणकर यांची निवड करण्यात आल्याचे वैजनाथप्पा लातुरे यांनी घोषित केले. सरचिटणीस पदाची धुरा व्यंकटेश हालिंगे सांभाळणार असून, उपाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी विष्णुजी भुतडा, लोकजागरचे प्रदेश उपाध्यक्ष दगडूसाहेब पडिले, भाजपाचे शहराध्यक्ष गुरुनाथ मग्गे, वनश्रीचे अजय गोजमगुंडे, आर्य समाज गांधी चौक चे अध्यक्ष ओमप्रकाशजी पाराशर, भारत माळवदकर, शंकरराव मोरे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डाॅ. हणमंत कोळेकर , राजेंद्र दिवे, बाबुअप्पा सोलापुरे यांची निवड झाली आहे.

कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलीप कानगुले यांच्यावर सोपविण्यात आली असून, अन्य पदाधिकारी असे :
महादेव खंडागळे ( मुख्य संघटक ) , आकाश गडगिळे ( युवक अध्यक्ष) , अजय राठोड ( दसरा मंडळ कार्याध्यक्ष), अमोल नान्नजकर, संदीप पुणेकर ( संयोजक ).
हे सामूहिक दसरा महोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने यंदा फार भव्य प्रमाणात हा महोत्सव साजरा होणार असून, या वर्षीपासून शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनतेला सहभागी करुन घेण्यासाठी सर्व गट- तटांना एकत्रित करुन , शहर व ग्रामीण विभाग प्रथमच निर्माण करण्यात आला असल्याचे स्वागताध्यक्ष आ. रमेशप्पा कराड यांनी सांगितले. लातूर शहराची शान असलेला हा सुवर्ण महोत्सव अत्यंत अलिशान व संस्मरणीय उत्साहपूर्ण जल्लोषात संपन्न करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
