लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदपूर शहरातील क्षेत्रामधील मान्यवरांच्या स्नेहभेटी
लातूर – 31/3/2024 ( वृत्तसेवा )-लातूर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी आणि महा युतीचे उमेदवार श्री. सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर अहमदपूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. प्रधान मंत्री श्री. नरेंद्रभाई मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी मतदान रुपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
भाजपा अहमदपूर विधानसभा अंतर्गत अहमदपूर शहरामध्ये विस्तारक श्री. चंद्रशेखरजी डांगे यांच्या निवासस्थानी भाग्यनगर, विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री संपन्न कुलकर्णी यांच्या निवासस्थानी फुलेनगर, सराफ लाईन, भाजप ग्रामीण महिला मोर्चा उपाध्यक्षा श्रीमती पुष्पाताई तेलंग यांच्या निवासस्थानी, अहमदपूर शहर जिल्हाध्यक्ष श्री सुशांतजी गुणाले यांच्या निवासस्थानी, माजी नगरसेवक श्री अमित भैय्या रेड्डी यांच्या निवासस्थानी रेड्डी कॉलनी परिसरातील तसेच मेन रोडवरील व्यापारी, दुकाने व प्रतिष्ठानातील नागरिकांच्या सदिच्छा भेटी घेतल्या.
यप्रसंगी भाजपा प्रदेश प्रवक्ते श्री. गणेश दादा हाके, भाजपा लातूर ग्रामीणचे अध्यक्ष श्री. दिलीपरावजी देशमुख, जिल्हा सरचिटणीस श्री. भारतजी चामे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अशोक काका केंद्रे, लातूर शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष ॲड. श्री गणेश गोमचाळे, कामगार मोर्चाचे श्री. ज्योतीराम चिवडे, तालुका अध्यक्ष श्री. प्रताप पाटील, श्री. सिद्धेश्वर पवार, श्री. बालाजी चामे, श्री. माणिक नरवटे, श्री. गोविंद गिरी, श्री. हनुमंत देवकते, श्री. मोहन सोनकांबळे, श्री. करण साबळे, श्री. बालाजी कांबळे, श्री. अंकुश बाऱ्हाळे, श्री. सोनूभाऊ दातार मित्रमंडळ लोहा आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.