27.1 C
Pune
Tuesday, May 13, 2025
Homeसांस्कृतिक*सिद्धेश्वर यात्रेत लाखो भाविकांच्या साक्षीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न*

*सिद्धेश्वर यात्रेत लाखो भाविकांच्या साक्षीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न*

*◆अक्षता सोहळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून श्री सिद्धेश्वर यांचे दर्शन घेतले◆
●*श्री गुरु श्री सिद्धेश्वरमय्या महाराज की जय….या जयघोषानी संपूर्ण परिसर दुमदुमला

सोलापूर, दि. 14 (. वृत्तसेवा.) :- सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या काठी संमती कट्टय़ावर लाखो भाविकांच्या साक्षीने पारंपरिक पद्धतीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न झाला. या सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली. अक्षता सोहळा पार पडताच ‘हर बोला हर, सिद्धेश्वर महाराज की जय’च्या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


अक्षता सोहळ्यासाठी खासदार डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सर्वश्री आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले, सर्वश्री माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, शिवशशरण पाटील, सिद्धेश्‍वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्‍वस्त ॲड. मिलिंद थोबडे, मोहन डांगरे आदि उपस्थित होते. या मुख्य सोहळ्यास महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून लाखो भाविक दाखल झाले होते.


‘शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जय’ या जयघोषात आज दुपारी सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डमचा उच्चार झाला अन्‌ चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी रविवारी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील पारंपरिक अक्षता सोहळा भक्ती भावात पार पडला. श्री सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला. संमती कट्याजवळ गंगा पूजन व सुगडी पूजन झाले. मानकरी कुंभार यांच्याकडून दिलेल्या सुगडीचे हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजन केले. सत्यम सत्यम म्हणताच भाविकांनी अक्षता टाकल्या.


*पालकमंत्री यांच्याकडून श्री सिद्धेश्वर यांचे दर्शन-
अक्षता सोहळा पार पडल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री सिध्देश्वर महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर देवस्थान समितीच्या वतीने पालकमंत्री यांचा श्री सिद्धेश्वर यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. यात्रा समितीचे प्रमुख महादपा चकोते यांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी पालकमंत्री व जिल्हा प्रशासन देत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा ही सत्कार करण्यात आला.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]