आम्ही लेखिका संस्थेच्या देश-विदेशातील साहित्यिकांना दिले 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे निमंत्रण
आम्ही लेखिका ही साहित्य क्षेत्रात पुर्ण भारतभर नव्हे तर देश-विदेशातील चालणारी रजिस्टर्ड संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री मोहन कुलकर्णी होते सध्याच्या संस्थेच्या अध्यक्षा सुनंदाताई पाटील ह्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याला याची शाखा आहे लातूर जिल्ह्याच्या आम्ही लेखिका शाखेच्या अध्यक्षा सौ. सविता धर्माधिकारी आहेत. प्रत्येक जिल्ह्यात व सर्वांचा मिळून एक असे साहित्यविषयक कार्यक्रम घेतले जातात.आम्ही लेखिका उपक्रमाअंतर्गत गुढीपाडव्याला 74 वा उपक्रम “गुढी शब्दांची ” या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संजिवनीताई बोकील व प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.सविता धर्माधिकारी यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सुनंदाताई पाटील यांच्या प्रास्ताविकांनी झाली. कविता कशी लिहावी कवितेची उंची कशी वाढवावी याचे सविस्तर विवेचन संजीवनीताई बोकील यांनी केले. सविता धर्माधिकारी यांनी गुढीपाडवा साजरा करण्यामागचा हेतू स्पष्ट करून स्वरचित कवितेतून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सर्व सखींना दिल्या.

गुढी पाडवा
नववर्षाचा सण
असे घरोघरी
मांगल्याची गुढी
उभी असे दारी
गुढी नभी उंच
गगनाला भिडे
पाय धरेवर
कधी नच सोडे
ज्ञान ,धन जरी
गुढीसम वाढे
परी सकळ जन
माणुसकी न सोडे
पळवले प्रयत्ने
भूत कोरोणाचे
सावट दुःखाचे
जगावरी नाचे
साहित्याची वारी
उदगीर शहरी
संमेलन स्थळी
जय्यत तयारी
आम्ही लेखिका
संमेलना यावे
आनंदाचे क्षण
साहित्यातून घ्यावे

माझ्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला येण्याचे निमंत्रण सर्व आम्ही लेखिका साहित्य संस्थेच्या देश-विदेशातून कार्यक्रमात सहभागी साहित्यिकांना दिले.
ऑनलाइन चालणाऱ्या या कार्यक्रमात गझलनंदा सुनंदाताई पाटील,जेष्ठ कवयित्री संजिवनीताई बोकील,अर्चना नार्वेकर,केतकी देशपांडे,उल्का मोकासदार,ममता मुनगीलवार, मृदुला कुलकर्णी विशाखा कुत्तूर ,सुनंदा पवार ,अनिता खडके शोभा माने, डॉ.संजीवनी तोफखाने, मनीषा लिमये, रेणुका पांचाळ शैला हळबे अशा अनेक दिग्गज साहित्यिकांनी यात भाग घेतला.
खूप छान ! अभिनंदन आणि शुभेच्छाही!
खूप छान ! अभिनंदन!