27.6 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसाहित्यसाहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी ना.संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक

साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी ना.संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक

९५ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन

मुंबई ,-(विशेष प्रतिनिधी)-

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे २२ते २४ एप्रिल २०२२या कालावधीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात होत आहे. सदर संमेलन थाटात व्हावे यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबईत पार पडली.


वाचन संस्कृती वाढीस लागून मराठी साहित्य वाचक आणि रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मराठी साहित्य संमेलन’ ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हा बहुमान यावर्षी लातूर जिल्ह्याला प्राप्त होत आहे. मराठी भाषा व मराठी साहित्य हा आपला अभिमान आहे. आपल्या जिल्ह्यात संमेलन होत असल्याने सर्वच घटकांनी एकत्रित येत सदर संमेलन यशस्वी करूया. सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.


यावेळी आ.संभाजी पाटील निलंगेकर ,आ.बाबासाहेब पाटील,आ.सतीश चव्हाण,आ. अभिमन्यू पवार, आ.विक्रम काळे संमेलन कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]