साहित्य कट्टा, हैदराबाद यांनी, महाराष्ट्रातील लोक कलांवर आधारित केलेली एक रंगतदार मिसळ .
साहित्य कट्टा या हैदराबाद मधील समुहाने, हायटेक भागातील रंगभुमी मधे 22 सप्टेंबर 2024 ला , महाराष्ट्रातील लोक कलांवर आधारित, एक मिसळ अशी ही , हा एक आगळा वेगळा कार्यक्रम प्रस्तुत केला. साहित्य कट्टा , गेल्या सात वर्षांपासून, समुहातील सदस्यांचे स्वलिखित विविध कार्यक्रम सातत्याने सादर करीत असते. हया समुहाने आता हैदराबाद मधील सांस्कृतिक क्षेत्रात स्वत:ची एक चांगली ओळख निर्माण केली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक , उज्ज्वला धर्म यांनी केले.व्यंकटेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ही नांदी संगीता तांबे,सुप्रिया आगाशे, संदीप केळकर व शैलेश जोशी यांनी गाऊन कार्यक्रमाची सुरुवात खूप छान केली.
कार्यक्रमाचा सुत्रधार अवधूत कुलकर्णी व त्याची सोबतीण अभिलाषा कुलकर्णी यांनी कार्यक्रम, त्यांच्या खमंग संवादांतून पुढे न्यायला सुरुवात केली व रंगभुमीत हास्याचा मळा फुलु लागला.
मंजिरी जवळेकर व आदिती पांंगारकर यांनी त्यांच्या बतावणीतून , रंगभुमीत हास्य कल्लोळ माजवला . बतावणीची लिमिट म्हणजे स्वित्झर्लंड मधे समिंदर , काश्मीर मधे वाळवंट , साडीची लांबी चंद्रा पर्यंत. बतावणीतील पुरुषांची मक्तेदारी, मंजिरी व आदिती यांनी मोडीत काढली.
ऋत्विक फाटक लिखित , सपाट रस्ता नको , झाडीतला बरा , ही लावणी अस्मिता काळे ने बहारदार पणे नृत्य करीत सादर केली त्यामुळे रंगभूमीत शिट्या व टाळ्यांचा खच पडला.
कार्पोरेट डेट, ही लघु नाटिका मयुरा फाटक व ऋत्विक फाटक यांनी खुसखुशीत संवादाव्दारे , उत्तम सादर केली. या नाटिकेत आजच्या काळातील, तरुण – तरुणी कसे डेटिंग करतात यावर आधारित आहे.
ही नाटिका बघतांना प्रेक्षकांच्या चेहर्यावर प्रसन्न हास्य उमटले.
प्रकाश धर्म यांनी अतिशय मेहनत घेऊन भारुड लिहिले. भारुडाचे जे वैशिष्ट्य असते ते साधत त्यांनी व्दैअर्थी शब्द, विनोद, गाण्यातील गेयता , व भक्ती या सर्व गोष्टींचा समावेश, भारूडात केल्यामुळे ते , भारूडातील गूढार्थ, प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी झाले . जप , तप ,ध्यान, ही साधन अघोरी असून, भक्तिमार्ग सोपा सुखकारी, हे प्रेक्षकांना पटवून देण्यात प्रकाश धर्म यशस्वी झाले. तृप्ती आगाशे, संगीता तांबे, पुष्कर कुलकर्णी, सुप्रिया आगाशे, अरुण डवलेकर, अवधूत कुलकर्णी , श्रुती काकडे, सुरज मेश्राम, प्रकाश धर्म , यांनी भारुड सादर केले. अवधूत कुलकर्णी, संगीता तांबे यांनी भारुडाची रचना , पान्यावर नि स र ड भारी , हे गाण् खूप छान सादर केलं. ही रचना प्रकाश धर्म यांची होती. मुक्ता धर्म यांनी साउंड ट्रॅक तयार केला होता.
नवरा, बायकोचा रुसवा कसा काढतो हे सुमित पांडे व प्रीती पांडे यांनी खूप छान सादर केले. त्यांनी प्रकाश धर्म लिखित , भांडण मांडू पुन्हा पुन्हा , या गाण्यावर केलेल्या नाचाने वन्समोअर घेतला.
Stand up comedy, प्रवीण कावडकर व रश्मी नेमीवंत यांनी फार सुंदर सादर केली. ऑनलाईन डोहाळजेवण ही मजेदार संकल्पना या दोघांनी छान फुलवली व त्यामुळे प्रेक्षकांमधे हास्य जत्रा पसरली.
कार्यक्रमाचा सांगता , शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडयाने झाली . हा पोवाडा संगीता तांबे यांनी लिहिला होता . पोवाडा संगीता तांबे, सुप्रिया आगाशे, मंजिरी जवळेकर, आदिती पांगारकर यांनी वीरश्री पुर्ण आवेशात गायल्याने प्रेक्षकात पण वीरश्री निर्माण झाली. पेटीवर संदीप केळकर व तबल्यावर शैैलेेश जोशी यांनी साथ केली .
पोवाडा साधारण पणे पुरूष शाहिर मंडळी लिहितात व सादर करतात पण संगीता तांबे यांनी तितक्याच ताकदवार शब्दात पोवाडा लिहिला व तितक्याच वीरश्री युक्त आवेशात तो आपल्या भगिनी साथीदार, सुप्रिया आगाशे , मंजिरी जवळेकर व आदिती पांगारकर यांच्या सहभागाने सादर केला. ही पण या कार्यक्रमाची आणखी एक विशेषता आहे.कार्यक्रमाची प्रकाश व संगीत योजना नितिन बसरुर यांची होती. कार्यक्रमाचे लेखन प्रवीण कावडकर यांचे आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यात , शुभदा बसरुर, कविता वारके , मृणाल राव व प्रकाश फडणीस यांचा मोठा वाटा आहे.टाळ्यांच्या गजरात व जय शिवाजी जय भवानी , या वीरश्री पुर्ण घोषणा प्रेक्षकांकडून येत कार्यक्रम संपन्न झाला.
अरुण डवलेकर
23/9/2024