#स्वातंत्र्यवीर सावरकर
हे क्रांतिकारक, द्रष्टे विचारवंत, कवी, साहित्यिक, भाषा सुधारक म्हणून सुपरिचित आहेत. पण त्यांनी शाळेत असल्यापासून ते पुणे, मुंबई, लंडन येथे शिकत असताना व नंतर अंदमानच्या कारागृहातून व पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर केलेली जाज्वल्य पत्रकारिता हा त्यांच्या चरित्रातील अल्पपरिचित असा पैलू मांडणार आहेत, पत्रकारितेचे अभ्यासक देवेंद्र भुजबळ.
२८ मे रोजी सावरकर जयंती असते. त्यानिमित्ताने साहित्य कट्टा आणि इतिहास मंच संयुक्त विद्यमाने
मंगळवार,दिनांक ३० मे २०२३ रोजी संध्याकाळी ८ वाजता (शिकागो अमेरिका स्थानिक वेळ)
सादर होणाऱ्या या कार्यक्रमात अवश्य सहभागी व्हावे ,असे आवाहन साहित्य कट्टा व इतिहास मंच,
महाराष्ट्र मंडळ, शिकागो,अमेरिका यांनी केले आहे.
साहित्य कट्टा: अल्प परिचय
महाराष्ट्र मंडळ, शिकागोच्या कार्यकारिणीने कोव्हिड काळामध्ये अनेक उपक्रम सुरू केले, त्याचा श्री गणेशा ‘साहित्य कट्टा’ या ग्रुपने झाला. शिकागो विद्यापीठातील मराठीच्या प्राध्यापिका व नामवंत साहित्यिक
डॉ. सुजाता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘साहित्य कट्टा’ व ‘बोलका कट्टा’ ही रोपे लावली गेली. आजही ‘साहित्य कट्टा’चे आयोजक तो यशस्वीरीत्या चालवत आहेत.
‘साहित्य कट्टा’ मागचे उद्दिष्ट प्रामुख्याने अमेरिकेत मराठी भाषेची जोपासना करून वाचन-लेखनाद्वारे ती वृद्धिंगत करणे, सभासदांच्या मनात मराठी साहित्याविषयी गोडी निर्माण करणे, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या साहित्याच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ देणे, ज्यांच्यात साहित्यिक दडला आहे त्याला जागृत करणे आणि अर्थातच उत्तम कार्यक्रम आयोजित करून श्रोत्यांचे मनोरंजन करणे हे आहे. ‘साहित्य कट्टा’ वरील बरेच सभासद ‘रचना’ या अंकात आपले साहित्य प्रसिद्ध करतात.
मंगळवारी रात्री आठ वाजता ‘साहित्य कट्टा’ चा आभासी कार्यक्रम असतो. यात ‘महाराष्ट्र मंडळ, शिकागो ‘चे सभासद किंवा आमंत्रित पाहुणे मराठी साहित्य अथवा साहित्यविषयक कार्यक्रम सादर करतात. अनेक सभासद या आभासी कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत. ‘साहित्य कट्टा’ च्या बहुतेक कार्यक्रमांचे ध्वनिचित्रमुद्रण केले जाते. मंडळाच्या वेबसाईटवर किंवा युट्यूब वाहिनीवर लोकांसाठी ते उपलब्ध केले जाते. त्यांचा आस्वाद आपल्या वेळेनुसार श्रोते घेऊ शकतात.
ह्यावर्षी ‘साहित्य कट्टा’ चे आयोजक माधव गोगावले, श्रद्धा भट, समीर कुलकर्णी, अश्विनी कुंटे, मिलिंद साळी आणि प्रसाद अथणीकर हे आहेत.
ते ‘साहित्य कट्टा’ वर विविध कार्यक्रम आयोजित करतात.
महिन्यातील पहिल्या मंगळवारी सभासद स्वरचित कविता, लेख किंवा आपल्याला आवडलेले साहित्य वाचतात. दुसऱ्या मंगळवारी एखादा प्रसिद्ध मराठी साहित्यिक वा कवी निवडून त्यांच्या साहित्यावर कार्यक्रम सादर केला जातो. तिसऱ्या मंगळवारी ‘दुमडलेले पान’ या सदरात सभासद आपल्याला आवडलेले पुस्तक, कथासंग्रह, चरित्र, काव्यसंग्रह, कादंबरी याविषयी बोलतात. चौथ्या मंगळवारी ‘साहित्य कट्टा नसतो पण त्याऐवजी महिन्यातील चौथ्या रविवारी ‘बोलका कट्टा’ हा कार्यक्रम होतो. त्यासाठी भारतातून प्रसिद्ध लेखक-लेखिका, कवी-कवयित्री, नाटककार, गीतकार, पटकथाकार, पत्रकार, कलाकार यांना आमंत्रित केले जाते. या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या क्षेत्राविषयी, त्यांच्या अनुभवांबद्दल जाणून घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला जातो. महिन्यात जर पाच मंगळवार असतील तर त्यादिवशी एखादा खास कार्यक्रम ठेवला जातो.
खूपच छान देवेंद्र साहेब…!! आपल्या भाषणाची वाट पाहतो आहे…