सायकलपटु बालगीर यांचा सत्कार

0
358

 

 

आदर्शमैञी फांऊडेशनच्या वतीने

सायकलपटु संतोष बालगीर यांचा सन्मान

     लातूर-आदर्शमैञी फांऊडेशन लातुरच्या वतीने लातुरच्या मातीतील रत्न संतोष बालगिर याने संजीवनी सफर अंतर्गत संपुर्ण भारतभर 12,250 कि मी आंतर 182 दिवसात पुर्ण करुन एक वेगळे रेकाॕर्ड तयार केले त्याबद्दल आदर्शमैञी फांऊडेशन लातुर च्या वतीने फांऊडेशन चे अध्यक्ष संतोष बिराजदार व RCC चे प्रा शिवराज मोटेगावकर व मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह,शाॕल,श्रीफळ,पुष्पहार घालुन यथोचित सन्मान करण्यात आला.

आयोजित सन्मान सोहळा मध्ये माणुस प्रवासामुळे कसा समृद्ध होतो,प्रवासादरम्यान अनेक चांगले वाईट प्रसंग अनुभवायाला मिळाली व त्या प्रसंगास कसे सामोरे जायचे हेही शिकायला भेटले.देशातील 13 राज्यातील वेगळेपण पाहत कारगिल येथील सैनिकांना मानवंदना देऊन रायगड येथे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छञपती शिवाजी महाराज चरणी ही 12250 कि.मी. ,व 182 दिवसाची संजीवणी सायकल सफर अर्पण केली आसल्याचे मत यावेळी बोलताना संतोष बालगिर यांनी व्यक्त केले.

यावेळी तुकाराम पाटील यांनी भविष्यात संतोष बालगीरच्या नावे लातूर येथे आदर्शमैञी फांऊडेशनच्या वतीने सायकल मॕरेथाॕनचे आयोजन करण्यात यावे असे मत व्यक्त केले तर संतोषच्या या ऐतिहासिक कामाची नोंद म्हणून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकाच्या आभ्यासक्रमा मध्ये याचा समावेश व्हावा असे मत सच्चीदानंद ढगे यांनी व्यक्त केले. सायकलींग चे आरोग्य व निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने किती महत्त्व आहे हे मकरंद जाधव यांनी सांगितले,या प्रसंगी संतोष बालगिर ने ज्या कंपणीच्या सायकल वर ही सफर केली त्या कंपणीचा ब्रँड अंबेसिडर बनवण्याची विनंती आदर्शमैञी फांऊडेशन च्या माध्यमातून करणार असल्याचे मत शशिकांत पाटिल यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक फांऊडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी केले तर सुञसंचालन पदमाकर वाघमारे यांनी केले व आभार डी. एस .पाटील यांनी मानले. कार्यक्रमास सुंदर पाटील कव्हेकर,ॲड दासराव शिरुरे,प्राचार्य अविनाश सातपुते,असिफ शेख,राजु वानरे,गणेश जाधव आदिची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्पणा फरकांडे,विष्णु चव्हाण,मदन भगत,सुर्यवंशी आदिनी परिश्रम घेतले .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here