27.6 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसाहित्य*सामान्य माणसाचे प्रश्न मांडण्याचं लिखाण समुद्रे यांनी केले ...

*सामान्य माणसाचे प्रश्न मांडण्याचं लिखाण समुद्रे यांनी केले – दासू वैद्य*


 अरुण समुद्रे यांच्या ‘लक्षवेधी’चे प्रकाशन
     लातूर/प्रतिनिधी:जीवन जगताना सामान्य माणसाची विविध कारणांनी घुसमट होते.ही घुसमट करणाऱ्या प्रश्नांचा शोध घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी मार्गही दाखवण्याचे काम अरुण समुद्रे यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून केले, असे मत ज्येष्ठ साहित्यिक दासू वैद्य यांनी व्यक्त केले.     पत्रकार अरुण समुद्रे यांनी देवगिरी तरुण भारत, साप्ताहिक विवेक ,लोकराज्य या मध्ये लिहलेल्या लेख आणि बातम्यांचा संग्रह असणारा ‘लक्षवेधी’ या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.

दासू वैद्य

या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून दासू वैद्य बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे चेअरमन विवेक देशपांडे तर पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक मनोहरराव कुलकर्णी यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमास खा.सुधाकरराव शृंगारे,माजी मंत्री आ.संजय बनसोडे,आ.अभिमन्यू पवार,माजी आमदार वैजनाथ शिंदे,पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे,माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार आदींसह मान्यवर उपस्थित होते.   मनोगत व्यक्त करताना दासू वैद्य यांनी पुस्तक प्रकाशाचा हा सोहळा मंगल सोहळा असल्याचे म्हटले.लक्षवेधीमध्ये ३४ लेख आहेत.हे लेख म्हणजे लुकलुकणारे ३४अक्षर दिवे आहेत.अरुण समुद्रे यांच्या लेखनात तळमळ आहे.ज्याला प्रश्न पडतो तो व्यक्ती जिवंत मानला जातो.पत्रकार आणि लेखकांनाही असे प्रश्न पडतात. प्रश्न पडल्यानेच समुद्रे यांची लेखणी कार्यरत राहिली.त्यांनी सामान्य लोकांचे प्रश्न नुसते मांडलेच नाहीत तर त्याची उत्तरेही शोधून दिली,असेही वैद्य म्हणाले.   

विवेक देशपांडे

विवेक देशपांडे यांनी अरुण समुद्रे यांच्या प्रवासाचा मी एक भाग असल्याचे मत व्यक्त केले. इतरांच्या प्रगतीत आनंद मानणारा हा पत्रकार आहे.समाजाला ज्ञान देणारा व्यक्ती आणि विरळा मित्र अशी त्यांची ओळख सांगता येईल.संघावरील निष्ठेपायी चांगली नोकरी त्यांनी नाकारली. विधिमंडळात वार्तांकन करताना त्यांची पत्रकारिता उजळली.स्व.गोपीनाथराव मुंडे यांचा सल्लागार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. मुंडे यांची संघर्ष यात्रा,लालकृष्ण आडवाणी,मुरली मनोहर जोशी यांच्या यात्रांचेही वार्तांकन त्यांनी केल्याची आठवण देशपांडे यांनी सांगितली.   संपादक मनोहरराव कुलकर्णी यांनी स्तंभलेखनातून अनेक साहित्यिक घडल्याचे सांगत समुद्रे यांच्या लिखाणातून सकारात्मक संदेश मिळत असल्याचे म्हटले. अरुण यांनी मला गुरु म्हटले त्याअर्थी माझ्या शिष्याचा उत्कर्ष पाहून आनंद वाटतो.पुस्तक रूपाने अरुण यांना सरस्वतीचा प्रसाद मिळालेला आहे,असेही ते म्हणाले. 

  पत्रकार अतुल देऊळगावकर, प्रदीप नणंदकर,कल्पना भट्टड यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.   प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.पीयुष देशमुख,निखिल समुद्रे,सायली देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले.अरुण समुद्रे यांनी मनोगत व्यक्त करताना पुस्तक प्रकाशनामागची भूमिका विषद केली.   यावेळी नागपूर तरुण भारतचे   संपादक गजानन निमदेव व के.के. ग्राफिक्सचे किरण कुलकर्णी यांचा विवेक देशपांडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निखिल प्रा  सायलीसमुद्रे देशमुख व निखिल समुद्रे यांनी केले. निखिल यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

  यावेळी नॅचरल शुगरचे चेअरमन बी.बी. ठोंबरे,रेणा कारखान्याचेमाजीचेअरमनयशवंतरावपाटील,डॉ.पोतदार,कमलेश ठक्कर,भूषण दाते,दयानंद संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, ॲड.व्यंकट बेद्रे,भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे,जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उद्योजक दिलीप माने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थितीया ॲड.व्यंकट बेद्रे,भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे,जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उद्योजक दिलीप माने,अशोक गोविंदपुरकर,अतुल ठोंबरे,संपत पाटील,भारत सातपुते,सौ. कुमुदिनी भार्गव,प्रविण सरदेशमुख,सुधीर धुतेकर,संजय जेवरीकर,अनिल अंधोरीकर, डॉ.राधेश्याम कुलकर्णी,उत्तम होळीकर,धनंजय कुलकर्णी, सुनील देशपांडे सारोळकर, पत्रकार अशोक चिंचोले,संगम कोटलवार,हरी तुगावकर,रामानुज रांदड,रागिनी यादव,अजय महाजन, संतोष मुक्ता,दीपरत्न निलंगेकर यांच्यासह समाजाच्या विविध घटकातील मान्यवरांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]