सह्याद्री देवराई प्रकल्प

0
638

*तीन वर्षाच्या अथक प्रयत्नातून साकार झाली सह्याद्री देवराई लातूर*

*सह्याद्री देवराई लोकार्पण सोहळा*

लातूर जिल्ह्यातील पहिली सह्याद्री देवराई (रामवाडी -झरी ) तालुका चाकूर येथे २०१८ पासून सुरू झाली होती.

२०१९ मध्ये सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत लहान मुलांची एक वृक्ष शाळा इथे ४०० वर्ष वयाच्या वडाच्या झाडाखाली घेण्यात आली होती.

मागिल तीन वर्षांच्या अथक परिश्रमातून वन विभागाच्या🌳 जागेवर सह्याद्री देवराई ही लोक सहभागाच्या माध्यमातून उभी टाकली.या तीन डोंगराच्या समूहावर पावसाच्या पाण्यावर आत्तापर्यंत सहा २७ हजार मोठे वृक्ष व नैसर्गिक ४५/५० हजारांच्या वर झुडपे, कॅटर्स, शेरा, लोखंडी अश्या अनेक दुर्मीळ प्रजाती जगवल्या आहेत.

अतिशय कठीण दगड आणि मुरूम असलेल्या या डोंगरावर हा प्रकल्प उभा करण्यात आला. जवळपास ४० तरुण स्वयंसेवकाची सह्याद्री देवराई ची टीम येथे कार्यरत आहे. आता तर आजूबाजूच्या गावातील तरूण ,सरपंच पण या कार्यात सहभागी झाले आहेत .

आज या डोंगरावर वड ,पिंपळ ,कडुलिंब ,जांभूळ, भारतीय नोनी, मदन फळ ,चिरायता, अजानवृक्ष ,काटेसावर,🌳 सीताफळ, आवळा, सागवान, पांगारा ,पळस, गावरान आंबा ,लिंबू ,कढीपत्ता, सिसम, करंज, कदंब, गुळवेल अश्या अनेक दुर्मिळ प्रजाती आहेत.

स्वतंत्र भारतात मराठवाड्यात लोकसहभागातून निर्माण होत असलेला हा पहिला जंगल प्रकल्प होय. आज् या सह्याद्री देवराई चा लोकार्पण सोहळा प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे, राज्यमंत्री संजय बनसोडे, स्वागताध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील व डि एफ ओ गायकर, तहसीलदार बिडवे, वन यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध दुर्मिळ वृक्ष लावण्यात आली .कवी अरविंद जगताप यांची कविता घेण्यात आली. वृक्ष प्रतिज्ञा घेण्यात आली.यावर्षी या सह्याद्री देवराई प्रकल्पावर जून महिन्यात १३५० जुलै महिन्यात ११७५ ऑगस्ट महिन्यात ७०० झाडे लावण्यात आली आहेत.

चारी बाजूला बांधावर केकताड, बांबू, गजगा अशा बांधावरच्या वनस्पती लावण्यात आल्या आहेत. या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी सह्याद्री देवराई लातूरचे समन्वयक सुपर्ण जगताप , विलास चामे यांनी सांगितले हा प्रवास खडतर ,कठीण व त्रासदायक होता. पण लोकसहभागातून एकात्मिक बळ मिळाले आणि सर्वांनी मिळून हा प्रकल्प उभा केला. गावातील तरुणांचे, अनेक सरपंचाचे सहकार्य मिळाले. सह्याद्री देवराई हा प्रकल्प लोकांना प्रेरणा देण्यासाठी निश्चित दिशादर्शक ठरेल. स्वप्रेरणेने यावर्षी जवळपास दोन हजार वृक्ष निसर्ग प्रेमी लोकांनी या देवराई ला भेट दिली. लातूरहून पर्यावरणाचा संदेश देत ४० सायकल स्वार तरुण मंडळीही सायकल वर ५० कि मी देवराईला आली. देवराई पासून प्रेरणा घेऊन अनेक वृक्ष संवर्धन करणारी मंडळी लातूर जिल्ह्यात मराठवाड्यात तयार होत आहे .आज या कार्यक्रमाच्या वेळी डि एफ ओ गायकर तहसीलदार डॉक्टर बिडवे , सह्याद्री देवराईचे सुपर्ण जगताप, विलास चामे, अमृत सोनवणे , सौदागर कदम, डॉ बी आर पाटील, डॉ यादव, प्रा दशरथ भिसे, डॉ संदिप घोणसीकर, प्रवीण पारिख , भीम दुनगावे, झरी चे सरपंच सूर्यवंशी रामवाडी चे सरपंच मीना नागरगोजे ताई, तुकाराम नागरगोजे सर वन विभागाचे विभागीय अधिकारी अश्विनी आपेट ,श्री माळी ,अमोल सूर्यवंशी, बळीभाऊ नागरगोजे शिवशंकर चाफुले व अनेक गावकरी, वृक्ष प्रेमी उपस्थित होते.

संकलन : सुपर्ण जगताप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here