सहकार क्षेत्रातील महामेरू

0
278

कृष्णा सहकारी साखर कारखान्याची 

एक हाती सत्ता..डॉ.अतुल भोसलेंचे अभिनंदन..

 

लातूर जिल्ह्याच्या सहकार चळवळीचे आधारस्तंभ,एक सजग नेता दिलीपराव देशमुख यांचे जावई डॉ.अतुल भोसले यांनी कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर एक हाती सत्ता मिळवली आहे..त्यांच्या विरुद्ध 3 पक्ष,1 माजी मुख्यमंत्री,2 कॅबिनेट मंत्री,1 राज्यमंत्री,3 आमदार,खासदार असे सगळे लढूनही निकाल खेचून आणण्यात ते यशस्वी झाले आणि विरोधकांची एकही जागा आली नाही,उलट जनतेने 21 सभासद दणदणीत निवडून दिले..एक सालस,शांत राजकारणी म्हणून अतुल भोसले यांची ख्याती आहे..भाजपच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे पंढरपूर देवस्थान समितीचा कार्यभार होता..

भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे प्रदेश चिटणीस, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारे एक दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व. राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मोठा जनाधार प्राप्त केला.

डॉ.अतुल भोसले यांनी कराडच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्त्व केले..

डॉ.अतुल भोसले यांचा ‘बोले तैसा चाले’ या विचारावर ठाम विश्वास आहे. हाती घेतलेले काम ते तडीस नेतातच आणि ते काम अधिकाधिक चांगल्या रितीने करतात. मदत मागणारा कोणीही असो, दिवसरात्र कोणतीही वेळ असो किंवा आव्हान कितीही कठीण असो, जनतेची सेवा करताना डॉ.अतुल भोसले जराही बिचकत नाहीत. उच्च शिक्षण असले तरी सदैव जनसामान्यांशी संपर्क ठेवून उत्साहाने लोकाभिमुख कामे करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हाती घेतलेले काम तडीस नेईपर्यंत अथवा समस्या सुटेपर्यंत त्यांना स्वस्थ बसवत नाही. त्यांचे नेतृत्व हे नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे असलेले पारदर्शी नेतृत्व आहे..

कृष्णा हॉस्पीटलच्या माध्यमातून मोफत सर्वरोग निदान शिबिरांचे आयोजन, त्याचबरोबर गरजू, गरीब दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना बिलामध्ये जास्तीत जास्त सवलत दिली जाते.

अपंग मुले कुपोषित मुलांना दत्तक घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करुन त्यांना आहार वाटप केले जाते. तसेच अवघड शस्त्रक्रियाही अत्यंत अल्प दरात केल्या जातात.

स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक यांना औषधोपचारामध्ये विशेष सवलत देण्यात येते.

कृष्णा हॉस्पीटलच्या माध्यमातून झोपडपट्टीतील नागरीकांसाठी आरोग्यदायी दत्तक योजना राबवून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी उपाययोजना केल्या जातात.

‘कृष्णा जेष्ठ नागरिक सामाजिक सेवा संस्थे’तर्फे जेष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक मोफत सल्ला व आरोग्यदायी शिबिरांचे आयोजन केले जाते. तसेच त्यांचे वैयक्तिक स्तरावरील समस्यांचीही सोडवणूक केली जाते..

कराड शहर व लगतच्या ग्रामीण भागांमध्ये अजूनही मध्यमवर्गीय महिला या आर्थिक विवंचनेत असतात. अशा महिलांसाठी ’कृष्णा नारी शक्ती मंच’ च्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटाची उभारणी व मार्गदर्शन केले जाते.

बचत गटांच्या माध्यमातून विविध लघु व्यवसायाची उभारणी करुन त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला जातो.

‘कृष्णा सरिता महिला बजार’ माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या घरघुती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते.

महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने स्वंयरोजगारासाठी तसेच इतर कारणांसाठी ‘कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’ द्वारे अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते.

उच्च शिक्षण व औद्योगिक शिक्षणासाठी तरुणांना प्रोत्साहनपर व मार्गदर्शक कार्यक्रम तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगणक ज्ञानाविषयी शिबिरांचे आयोजन.

कृष्णा शिक्षण सक्षमीकरण अभियानाअंतर्गत दरवर्षी 1,00,000 विद्यार्थ्यांना मोफत वह्या व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य दिले जाते.

ग्रामीण भागातील विद्यार्थांना संगणकीय तसेच तांत्रिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी विविध अभ्यासक्रमाची सोय असलेली महाविद्यालये, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी भविष्यात जागतिक स्पर्धेत टिकला पाहिजे यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करुन शिक्षणाची सोय करुन दिली..

लोकाभिमुख उपक्रम, व्याख्याने, मेळावे, चर्चासत्रे, क्रिडा स्पर्धांचे सात्यताने आयोजन,

ज्ञानवद्धीसाठी गाव तिथे ग्रंथालय ही चळवळ सातत्याने राबविण्याचा प्रयत्न,

दुर्गम भागातील नागरिकांसाठी पाणी टंचाईच्या काळात कूपनलिका ( बोअरवेल) उपलब्ध करुन देऊन, गरज असेल तिथे टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध करुन दिली.

युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी पंढरपूर वारीला जाणा-या वारकरी बांधवांना अल्पोपहार,इतर आवश्यक साहित्याचे वाटप व गरजेनुसार आर्थिक मदतही देण्यात येते.समाजकल्याण हा विषय डॉ.अतुल भोसले यांच्या सर्व धोरणांचा व कृतीचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे हा त्यांच्यासाठी स्वतंत्र विषय नाही. कठोर परिश्रम करणारा राजकारणी अशी यांची ओळख आहे व त्यांच्या सर्व कामांमध्ये त्यांना जनतेचा आशिर्वाद लाभला आहे. नागरी भागात पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठा करणे.

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आपल्याच परिसरामध्ये रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विविध संस्थांद्वारे

ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी रोजगार अभियानांचे आयोजन करुन या माध्यमातून जवळपास पाच हजार तरुणांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्झ झाला आहे..

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वंयरोजगारासाठी व्यवसायासाठी व शेती विकासासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी ‘कृष्णा सहकारी बँकेमार्फत ’ अर्थसहाय्य उपलब्ध करून दिली..

भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील सुमारे ५४ टक्के लोकसंख्या पंचवीसपेक्षा कमी वयाची आहे तर ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ७२ टक्के आहे. आपल्याला लोकशाही अर्थपूर्ण बनवायची असेल तर अधिकाधिक युवकांनी सक्रीय होण्याची आणि निर्णयाच्या आणि बदलाच्या प्रक्रियेत भाग घेण्याची गरज आहे. देशातील युवकांना वाटते की त्यांच्या आकांक्षांनुसार आणि स्वप्नांनुसार देशाने झटपट विकास करावा व प्रगत बनावे. तसे घडण्यासाठी हा मुद्दा समजून युवकांच्या आकांक्षांशी एकरूप होणार्या नेतृत्वाची गरज आहे.

जेंव्हा डॉ.अतुल भोसले बोलतात त्यावेळी सर्व जण दखल घेतात. एक आघाडीचे वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांची भाषणे मुद्देसूद व अर्थपूर्ण असतात आणि कोणताही आडपडदा न ठेवता ते बोलतात. त्यांना आकडेवारी तोंडपाठ असते. त्यांच्या भाषणांना सखोल संशोधनाचा आधार असतो. केवळ बोलघेवडेपणा न करता कृतीवर भर देणारा आणि कधीकधी आधी काम करून मगच त्याबद्दल बोलणारा नेता त्यांच्या भाषणातून जनतेला, राजकीय सहकार्यां ना जाणवतो..

डॉ.अतुल भोसले यांच्याकडे मोठ्या प्रमाणात राजकीय चातुर्य आहे. चाणाक्ष बुद्धी, नैतिक सामर्थ्य आणि संघटनात्मक कौशल्यासाठी ते ओळखले जातात. दूरदृष्टी व ठामपणा असला तरी व्यवहारात कमालीचा साधेपणा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

मोकळ्या मनाचा मृदुभाषी नेता. बोलण्यापेक्षा कर्तृत्वावर भर. कोणत्याही कामात स्वतः आघाडीवर रहायचे आणि आपल्या कामाने उदाहरण घालून द्यायचे, अशी त्यांची रीत आहे. विकासाची बीजे रोवायसाठी स्वतः मातीत हात घालण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही. एखाद्या कार्यक्षम मुख्याधिकार्याःप्रमाणे आधी केले मग सांगितले हे त्यांचे धोरण आहे. कधीकधी तर केवळ काम करा पण त्याची वाच्यता करू नका असेही त्यांचे वागणे असते. विकासाच्या मार्गावर जाण्यासाठी जनतेला सबळ करण्यासाठी, त्यांना एकत्रित करण्यासाठी आणि त्यांचे नेतृत्व करण्यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस म्हणून महाराष्ट्र भाजपात प्रवेश करत त्यांनी सुरुवातीला राजकीय कारकीर्द सुरू केली.

 

राजकीय टप्पे

• अध्यक्ष – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर

• प्रदेश चिटणीस – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र

• निमंत्रित सदस्य – जिल्हा नियोजन समिती सातारा

• जिल्हा प्रभारी – सांगली जिल्हा व सांगली ग्रामीण भाजपा

• चेअरमन – कृष्णा सहकारी बँक लि.रेठरे बुद्रुक

 

अशा बहुआयामी युवा नेत्याचे अभिनंदन आणि शुभेच्छा .

लेखन

संजय जेवरीकर

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here