लातूर: पारंपरिक आणि आधुनिक विकासापासून दूर असलेली शेती राजर्षी शाहू महाराजांनी आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीचा विकास केला. राजर्षी शाहू महाराजांनी देशात सहकाराचा पाया पहिल्यांदा घातला, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या “लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त” आयोजित व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या वाचन कक्षात ही व्याख्यानमाला दोन दिवस घेण्यात आली. डॉ.सोमनाथ रोडे यांनी “राजर्षी शाहू महाराजांचे शेती,सहकार, व्यापार उद्योगातील योगदान” या विषयावर ते बोलत होते.
व्याख्यानमालेचा प्रारंभ विद्रोही संत तुकाराम व लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करून झाला.प्रास्ताविक मसाप शाखा लातूरचे सचिव डॉ दुष्यंत कटारे यांनी केले.राजर्षी शाहू महाराजांचे कार्य समाजासमोर मांडण्याचा मसापच्या प्रयत्न आहे, असे सांगितले. याप्रसंगी डॉ जयद्रथ जाधव यांना गुरूवर्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व डॉ दुष्यंत कटारे यांची व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाबळगाव येथे प्राचार्य म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ.सोमनाथ रोडे व प्राचार्य डॉ श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ श्रीकांत गायकवाड होते.
डॉ.सोमनाथ रोडे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या शेती,सहकार, व्यापारी व उद्योग धोरणावर संदर्भासह प्रकाश टाकत अत्यंत प्रभावी व्याख्यान दिले.शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकराजा होते.शेतक-यांना दुष्काळातून मुक्त करण्यासाठी राधानगरी धरण बांधले.सिंचनाच्या सोयी निर्माण करून शेतकऱ्यांना दुष्काळाच्या तावडीतून सुटका केली.अनेक प्रसंगी ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जात, आणि त्यांच्या सोबत राहून शेतकऱ्यांचा हिताचे धोरण राबवत असतं.शेतीत आधुनिक तंत्रज्ञान,बी- बियाणे, अवजारे,रबर,ताग,चहा व फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन दिले.किफायतशीर अवजारांचे प्रदर्शन जत्रेत भरवले, शेतकऱ्यांना सावकारांच्या लुटीतून मुक्त करण्यासाठी सहकारी बँका, पतसंस्था व सहकारी सोसायट्या निर्माण केल्या.देशात सहकाराचा पाया घालणारे महाराज हे पहिले राजे होते.कोल्हापूर स्थानिक विणकर,कामगारांना उद्योग- व्यापारासाठी प्रोहोत्सान दिले.व्यापा-यांना वखारी दिल्या.कर्ज दिले. शेतकऱ्यांच्या गुळाला गुळासाठी व इतर व्यावसायिक व्यापारासाठी जयसिंगपूर बाजारपेठ निर्माण केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ श्रीकांत गायकवाड यांनीही “राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक अभिसरणातील भूमिका” या विषयाने व्याख्यानाची मांडणी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करणारे शाहू राजे पहिले होते.अनेक अस्पृश्य परिषदेमधून अस्पृश्य विरोधात त्यांनी विचार मांडले.दलित समाजाच्या शिक्षणासाठी खस्ता खाल्ल्या.वसतिगृह चळवळ सुरू केली. दलितांना पन्नास टक्के आरक्षण देणारे शाहू महाराज हे पहिले राजे होते. यामुळे राजर्षी शाहू महाराज हे लोकराजा होते. असे अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ श्रीकांत गायकवाड यांनी केले.या व्याख्यानास रामराजे आत्राम,अॅड.हाशम पटेल, कवी रमेश चिल्ले, कवी रामदास कांबळे, डॉ.संभाजी पाटील, डॉ.लहू वाघमारे,प्रा.मुल्लासर, डॉ.हावळे सर,प्रा.हुडेकरी अप्पा, कवी रमेश हानमंते, कवयित्री उषा भोसले,श्री किसन भोसले, कवी दिलीप गायकवाड, डॉ.रत्नाकर बेडगे, महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते.या व्याख्यानमास मसाप अध्यक्ष डॉ जयद्रथ जाधव, सचिव डॉ दुष्यंत कटारे, कवी प्रकाश घादगिने, कवी नरसिंग इंगळे,प्रा नयन राजमाने यांनी पुढाकार घेतला.सूत्रसंचालन कवयित्री प्रा.नयन राजमाने यांनी केले तर आभार डॉ जयद्रथ जाधव यांनी मानले.