सर्वगुणी महिलांचा सन्मान

0
373

टाटा टी प्रीमियमच्या नव्या कॅम्पेनमध्ये महाराष्ट्रातील ‘सर्वगुणी’ महिलांचा सन्मान; म्युलेन लिंटासने तयार केले नवे कॅम्पेन

मुंबई…..२०१९ साली सर्वात पहिल्यांदा सुरु करण्यात आलेल्या, स्थानिक मुद्द्यांवर विशेष भर देणाऱ्या कॅम्पेन्सच्या सीरिजमध्ये टाटा टी प्रीमियमने आणखी एक टीव्ही जाहिरात सादर केली आहे.

प्रत्येक राज्याराज्याचे मुख्य सार दर्शवणाऱ्या, स्थानिकतेवर विशेष भर देणाऱ्या आणि प्रत्येक प्रदेशातील लोकांच्या खास आवडीनिवडींना महत्त्व देणाऱ्या जाहिराती टाटा टी प्रीमियमने उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा व ओडिशा या पाच राज्यांमध्ये प्रस्तुत केल्या होत्या. या जाहिराती म्युलेन लिंटास बंगलोरने बनवल्या होत्या. स्थानिक संबंधांना अधिक दृढ करण्याचा दृष्टिकोन कायम राखत ‘देश की चाय’ टाटा टी प्रीमियमने ‘सर्वगुणी चाय’ ही संकल्पना घेऊन महाराष्ट्रात पुन्हा एकदा दमदार पदार्पण केले आहे.

यामध्ये संपूर्ण पॅक पूर्णपणे नव्या रूपात, नव्या संदेशासह सादर करण्यात येत असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा सन्मान केला गेला आहे. महाराष्ट्राचा अभिमान दर्शवणाऱ्या गोष्टींचा समावेश असणारी, राज्यासाठी खास तयार करण्यात आलेली टीव्ही जाहिरात मराठी महिलांचे ‘सर्वगुणी’ हे वैशिष्ट्य दर्शवते आणि कॅम्पेनची संकल्पना अधिक दृढ करते.

आपल्या या जाहिरातीमधून टाटा टी प्रीमियम ब्रँड महाराष्ट्रातील खास जीवनपद्धतीचा सन्मान करत आहे, अशी जीवनपद्धती जी येथील संस्कृती आणि संपन्न पारंपरिक वारसा यांच्या भक्कम पाठिंब्यावर उभी आहे. संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धती टिकवून ठेवण्यात महाराष्ट्रीय महिलांचे किती मोठे योगदान आहे हे या जाहिरातीमधून दर्शवले गेले आहे. आणि त्याबरोबरीनेच हे योगदान हा त्यांचा एकमेव गुण नाही तर त्या सर्वगुणी आहेत हे देखील हे कॅम्पेन सांगते.

म्युलेन लिंटास बंगलोर ने तयार केलेल्या या फिल्ममध्ये एक पारंपरिक मराठी गृहिणी दाखवण्यात आली आहे, जी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांविषयी जागरूक आहे, मुले, घरातील ज्येष्ठ आणि घर या सर्वांची ती नीट काळजी घेते. त्याबरोबरीनेच ही मराठी स्त्री आधुनिक आहे, तिच्यामध्ये धडाडी आहे, आत्मविश्वास आहे, आपल्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय चपखलपणे आणि दिमाखात पार पाडते. मराठी स्त्री ‘सर्वगुणी’ आहे, अगदी टाटा टी प्रीमियमसारखीच, टाटा टी प्रीमियम हा सर्वगुणी चहा आहे, स्वादिष्ट, दाट आणि कडक! टाटा टी प्रीमियम म्हणजे महाराष्ट्राचा चहा!

जाहिरात पाहण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा: https://www.youtube.com/watch?v=_bB3TaRXTA

नव्या कॅम्पेनबद्दल टाटा कन्ज्युमर प्रोडक्ट्सचे पॅकेज्ड बेव्हरेजेस विभागाचे भारत व दक्षिण आशियाचे अध्यक्ष श्री. पुनीत दास यांनी सांगितले, “टाटा टी प्रीमियमने नेहमीच स्थानिक चवी आणि त्यांच्याबद्दलच्या स्थानिक आवडीनिवडींना महत्त्व दिले आहे व त्या पूर्ण करणे हे टाटा टी प्रीमियमचे खास नैपुण्य आहे. भारतातील विविध भौगोलिक प्रदेशातील लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार आम्ही अनोखे ब्लेन्डस सादर करत असतो. म्हणूनच आज टाटा टी प्रीमियम हा देशभरातील आघाडीच्या ब्रँड्समध्ये गणला जातो, ‘देश की चाय’ हे बिरुद टाटा टी प्रीमियमसाठी अगदी समर्पक आहे. आमच्या नव्या कॅम्पेनमध्ये ‘देश की चाय’ टाटा टी प्रीमियम महाराष्ट्राचा सन्मान करत आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान या कॅम्पेनमधून दर्शवला गेला आहे. मराठी महिला म्हणजे सर्वगुणी ही संकल्पना घेऊन तयार करण्यात आलेली ही जाहिरात टाटा टी प्रीमियम ब्रँड आणि महाराष्ट्र यांच्यातील घनिष्ठ नाते दर्शवते. राज्याराज्यांच्या वैशिष्ट्यांचा सन्मान करण्याचे आणि नव्या संकल्पना, नव्या विचारांचे नेतृत्व करण्याचे आमचे धोरण या जाहिरातीमधून अधोरेखित केले गेले आहे.”

म्युलेन लिंटासचे सीसीओ अझाझुल हक आणि गरिमा खंडेलवाल यांनी सांगितले, “सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय संपन्न व समृद्ध राज्य ही महाराष्ट्राची ठळक ओळख आहे. मराठी लोकांना त्यांच्या संस्कृतीचा अपरंपार अभिमान वाटतो. पारंपरिक मूल्ये, चालीरीती यांना महत्त्व देत असतानाच नव्या विचारांचे स्वागत करणाऱ्या मराठी संस्कृतीचा सन्मान करावा ही आमची संकल्पना होती. गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी मराठी संस्कृतीची ही वैशिष्ट्ये उठून दिसतात. पारंपरिक पेहरावातील स्त्रिया मोटारसायकलवर स्वार होतात, तर कोणी रॉकस्टार्सप्रमाणे ढोल वाजवतात. या जाहिरातीमधून मराठी संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेचा व प्रगतिशीलतेचा सन्मान केला गेला आहे.”

सर्व ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमांमध्ये हे कॅम्पेन सुरु करण्यात आले आहे.

क्रिएटिव्ह: अझाझुल हक, गरिमा खंडेलवाल, प्रसाद वेंकटरमण, अभिलाष मुंदयात, रणबीर भोगल

अकाउंट मॅनेजमेंट: हरी कृष्णन, लोपामुद्रा भट्टाचार्य, अनाहिता ब्रार

प्लॅनिंग: एकता रेलन, सुषमा आर राव, गार्गी सरवणकर

निर्मिती: ग्रीन ग्रास फिल्म (दिग्दर्शक: अनाम मिश्रा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here