32.1 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeआंतरराष्ट्रीय*सरगम कौशल मिसेस वर्ल्ड 2022*

*सरगम कौशल मिसेस वर्ल्ड 2022*

मुंबई: भारताच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड 2022 चा (Mrs World 2022) किताब जिंकला आहे. सरगमने (Sargam Koushal) मिसेस पॉलिनेशियाला (mrs polynesia) हरवून या किताबावर नाव कोरले आहे. यामुळे भारताच्या खिशात तब्बल 21 वर्षानंतर मिसेस वर्ल्ड 2022 चा मुकुट आला आहे. या तिच्या कामगिरीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.  

अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड 2022 चा (Mrs World 2022) किताब जिंकून इतिहास रचला आहे. सरगम कौशलने मिसेस पॉलिनेशियाला हरवून मिसेस वर्ल्ड 2022 चे विजेतेपद पटकावले आहे. सरगमने 21 वर्षांनंतर हा मुकुट भारतात आणला आहे. त्यामुळे सरगमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अमेरीकेत मिसेस वर्ल्ड 2022 चा (Mrs World 2022)  किताब जिंकणारी सरगम कौशल (Sargam Koushal) देशात मुळची जम्मू-काश्मीरची आहेत. ती विझागमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती. तसेच तिचे पती भारतीय नौदलात काम करतात. कौशलने ग्रँड फिनालेसाठी एक आकर्षक गुलाबी रंगाचा  स्लीव्हलेस गाऊन परिधान केला होता. हा गाऊन भावना राव यांनी डिझाईन केला होता.  मिसेस इंडिया पेजने सरगम कौशलचा (Sargam Koushal)  अमूल्य विजय आणि मुकुटची पोस्ट शेअर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]