समर्थ बुथ अभियान

0
214

 

मतदारांच्या संपर्कासाठी समर्थ बुथ अभियान

सक्षमपणे राबवा-गुरुनाथ मगे

लातूर/प्रतिनिधीः- भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांसाठी कार्यरत असणारा पक्ष असून केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन पक्षाची वाटचाल चालू नसते. त्यामुळेच निवडणूका असो या नसो सर्वसामान्यांशी संपर्क सातत्याने ठेवण्यासाठी पक्षासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणजे समर्थ बुथ अभियान असून मतदारांच्या संपर्कासाठी हे अभियान सक्षमपणे राबवावे असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी केले आहे.

राज्यभरात भाजपाच्या वतीने समर्थ बुथ अभियान राबविण्यात येत असून लातूरात या अभियानाची रुपरेषा ठरविण्यासाठी जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर शहर जिल्हा भाजपाच्या पदाधिकार्‍यांची व लोकप्रतिनिधीची बैठक पार पडली. या बैठकीत गुरुनाथ मगे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश कार्यकारणी सदस्य शैलेश लाहोटी, संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, मनपा गटनेते अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, माजी उपमहापौर देविदास काळे, सरचिटणीस प्रविण सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस्या अ‍ॅड. जयश्री पाटील, प्रेरणा होनराव, स्वाती जाधव, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांची उपस्थिती होती.

केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन भाजपाचे संघटन कार्य चालू नसते असे सांगून जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी भारतीय जनता पक्षाची विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहंचविण्यासाठी सातत्याने पक्षसंघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम चालू असतात. या कार्यक्रमाच्या अंतर्गतच सध्या समर्थ बुथ अभियान संपुर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अभियानाची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिनी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे सांगून हे अभियान यशस्वी करून या दिवशी पंतप्रधान मोदी यांना राज्याच्या वतीने संघटनात्मक भेट द्यायची असल्याचे सांगितले. त्यामुळेच हे अभियान अत्यंत गांभीर्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगून या अभियानाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहंचणे सहज शक्य होणार आहे. त्याचबरोबर पक्षाचा पायाही मजबुत होण्यास मदत होणार असून पक्षाची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचली जाणार आहे. त्यासाठी समर्थ बुथ अभियान अधिक सक्षमपणे राबविण्यासाठी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी एकत्रीत येऊन काम करावे असे आवाहन केले.

प्रदेश कार्यकारणी सदस्य शैलेश लाहोटी यांनी भाजपाची विचारधारा आजही लातूरकरांना आपलीसी वाटत असून ही विचारधारा आणि पक्षाचा पाया अधिक मजबुत करण्यासाठी समर्थ बुथ अभियान अत्यंत महत्वाचे अभियान असल्याचे स्पष्ट केले. या अभियानाच्या माध्यमातून आगामी लातूर मनपाच्या निवडणूका संपुर्ण बहुमताने जिंकण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे सांगत सदर अभियान केवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीच नव्हे तर लोकप्रतिनिधींनी सुद्धा गांभीर्याने घेऊन या अभियानाच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक योगदान द्यावे असे आवाहन केले.

मनपा गटनेते अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी प्रदेश पदाधिकार्‍यांनी ज्या पद्धतीने हे अभियान राबविण्यात सांगितले आहे त्या पद्धतीने राबविण्यासोबतच प्रत्येकांनी आपआपल्या संकल्पनाची जोड या अभियानाला देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. सदर अभियान निवडणूका जिंकण्याचा मोठा महामार्ग असून या महामार्गावर लोकप्रतिनिधी, पक्षपदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रीत येऊन पक्ष संघटनेचा वेध अधिक वाढवावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी अ‍ॅड. दिग्विजय काथवटे यांना पक्ष संघटनेत बढती देऊन त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच अ‍ॅड. शितल पाटील यांना सरचिटणीस तर अ‍ॅड. प्रदिप मोरे, किसन बडगिरे, केदार रासुरे, दिगंबर माने यांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार यांनी सदर अभियान कोणत्या पद्धतीने राबविण्यात येणार आहे याची माहिती सांगितली. बैठकीचे सुत्रसंचलन प्रविण सांवत तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. दिग्विजय काथवटे यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here