33.3 C
Pune
Sunday, May 4, 2025
Homeसहकार*सभासदांना लक्ष्मी अर्बन बँकेचा ९ टक्के लाभांश*

*सभासदांना लक्ष्मी अर्बन बँकेचा ९ टक्के लाभांश*

लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न….
९ टक्के लाभांश जाहीर..

लातूर :- लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि लातूर या बँकेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. १६.०९.२०२३ रोजी भालचंद्र ब्लड बँक लातूर येथील सभागृहात उत्साहात संपन्न झाली.या सभेत सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

सभेपुर्वी सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांचेकडून प्राध्यापक श्रीपती येळीकर यांनी सहकार शिक्षण/ प्रशिक्षण कार्यक्रम घेतला. ‌सभेची सुरुवात लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली, तसेच दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सभेसाठी बँकेचे सभासद तथा जेष्ठ विधीज्ञ मनोहरराव गोमारे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती, त्यांचा बँकेतर्फे सन्मान करण्यात आला.

बँकेचे सभासद वैभव माधवराव तळेकर यांनी शेतकऱ्यांच्या मुलींसाठी वसतिगृह बांधकाम करण्यासाठी मराठा सेवा संघास १३ हजार चौरस फूट जागा दान दिली त्यामुळे बँकेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच बँकेचे सभासद बालाप्रसाद बिदादा व सुधीर गोजमगुंडे यांची उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बँकेचे माजी तज्ञ संचालक तेजमलजी बोरा व माजी संचालक प्रल्हाद दुडिले यांनी मागील काळात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

सभेचे अध्यक्ष व बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी सभेचे प्रास्तविक व अहवाल वाचन केले. अशोक अग्रवाल यांनी मागील काळात बँकेने केलेल्या आर्थिक व सामाजिक कार्याचा अहवाल हा सभागृहासमोर मांडला, ९ % लाभांश जाहीर करताच सभासदांनी टाळाच्या गजरात दाद दिली. बँकेकडून सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी सभागृहास दिली, “आपल्या बँकेचे डिजिटल बँकिंग मध्ये रूपांतर झाले असल्याचे” त्यांनी सांगितले. मोबाईल बँकिंग व ईतर सुविधेचा लाभ घेण्याचे त्यांनी सभासद व ग्राहकांना आवाहन केले. बँकेला अविज पब्लिकेशन कोल्हापूर यांचेकडून सलग तिसऱ्यांदा बँको पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी सर्व संचालक, सभासद, ग्राहक व कर्मचारी यांचे अभिनंदन केले तसेच बँकेच्या संचालिका सौ. कमलादेवी विजयकुमारजी राठी यांना दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकस असो. लि. मुंबई यांच्या कडून संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव असा पुरस्कार मिळाल्याने बँकेसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले.

जेष्ठ विधीज्ञ मनोहरराव गोमारे यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेच्या प्रगतीबाबत संचालक मंडळाचे अभिनंदन केले व अशा बँकेचा सभासद असणे म्हणजे अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश आळंदकर यांनी सभेचे विषय मांडले व उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात विषयांना मान्यता दिली. अर्थिक वर्ष २०२२-२०२३ या वर्षात विशेष काम करणाऱ्या कर्मचारी व शाखांचा गौरव यावेळी करण्यात आला. माजलगाव येथील ग्राहकाचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसदारास पत्नीस श्रीमती मंगल नागनाथ पोईनकर यांना विमा रक्कम धनादेश देण्यात आला.

सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनोहरराव गोमारे, बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल, व्हा. चेअरमन सतिष भोसले, संचालक सूर्यप्रकाश धूत, अॅड. धर्मवीर जाधव, सुरेशचंद्र जैन, लक्ष्मीकांत सोमाणी, अजितलाल आळंदकर, शशिकांत मोरलावार, विजय वर्मा,सौ.कमलादेवी राठी, सौ. माला भुतडा,सौ. रचना ब्रिजवासी, आशिष अग्रवाल, विशाल पाचंगे (हलवाई), तज्ञ संचालक राजेश अग्रवाल, माजी तज्ञ संचालक तेजमलजी बोरा, माजी संचालक प्रल्हाद दुडिले, सभासद बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, उत्तमराव मोहिते,हरीकिशन तोष्णीवाल, पद्माकर मोगरगे, वैभव तळेकर,तुळशीराम गंभीरे, सुरेश धानुरे, अजय दुडिले तसेच विविध शाखांचे सल्लागार राजीव शहरकर, विश्वनाथ म्हेत्रे, बालाजी कोंडावार, प्रेमचंद भोरकर, डॉ. उदयसिंह मोरे, नितीन होळे, शिवप्रसाद लडडा, राधेशामजी लोहिया, डॉ. शैलैश पाठक, बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर, अधिकारी हनुमानदास बांगड, प्रताप जाधव, अनिता कातपुरे, संतोष बनभेरु, रविंद्र मदने, दिनेश कांबळे, सुहास राजमाने, सिद्धेश्वर पवार, शिवकुमार राजमाने, किरण सुडे, परमेश्वर कडकंजे, अनुप सुवर्णकार, अनंत दिक्षित, सत्यजित सुर्यवंशी, उमाकांत सुर्यवंशी तसेच सभासद व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बँकेचे व्हा. चेअरमन सतिष भोसले यांनी आभार मानताना बँकेच्या वाटचालीत सर्व संचालक, सभासद, ग्राहक,सहकार क्षेत्रातील अधिकारी, भारतीय रिझर्व बँकेचे अधिकारी,पिग्मी प्रतिनिधी व कर्मचारी यांचा खूप मोठा वाटा असल्याचे नमूद केले. बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुशिल जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]