19.3 C
Pune
Sunday, December 22, 2024
Homeलेख'सपनो का सौदागर'

‘सपनो का सौदागर’

हिंदी चित्रपटांना जगभरात पोहचविणारा शोमॅन अशी एक प्रकारे नवी ओळख मिळवून देणारा अभिनेता व दिग्दर्शक, निर्माता म्हणजे राजकपूर, आशयघन पटकाथा आणि संगीत यांची मेजवानी ठरणारे चित्रपट निर्माण करताना सामाजिक संदेश देण्याचं मुल्यवान काम या महान चित्रपट दिग्दर्शकाने केलं. अनेकांना पडद्यावर आणण्याचं काम करताना आपण या चित्रसृष्टीचे खऱ्या अर्थानं ‘सपनो का सौदागर’ असल्याचे आपल्या कामातून राज कपूर यांनी दाखवून दिलं.


वयाच्या केवळ 10 व्या वर्षी ‘इन्कलाब’ चित्रपटातून सुरु झालेला हा प्रवास अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून वळणं घेत मृत्यूने गाठेपर्यंत अविरत सुरु राहिला. 14 डिसेंबर 2024 हे या महान कलाकाराचे 100 वा जयंती दिन आणि या प्रवासावर थोडा प्रकाश टाकायला देखील प्रदीर्घ लिखाण करावं लागेल.
पृथ्वीराज कपूर यांचा पुत्र म्हणून चित्रपट सृष्टीला आरंभीची ओळख मात्र त्यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीचा इतिहास लिहिताना कपूर घराणं विस्तारलं आर.के. फिल्म्स हा ख्यातनाम ब्रॅन्ड बॉलीवूडला देणाऱ्या राजकपूर यांच्या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. यश-अपयश हा प्रवास देखील या काळात अनुभवला आणि ‘बाँबी’ सारख्या चित्रपटातून पुन्हा यशस्वी होण्याचं कसब या अभिनेत्याकडे होतं.

1948 साली आर. के. फिल्म्स सुरू केल्यावर दिग्दर्शनाकडे वळलेल्या राजकपूर यांना पहिलं मोठं यश ‘बरसात’ चित्रपटात मिळालं त्या आधीचे त्यांचे 2 चित्रपट तिकिटबारीवर फारसा चमत्कार करू शकले नव्हते. त्याच वर्षी दिलीपकुमारसह केलेला चित्रपट ‘अंदाज’ देखील यशस्वी ठरला. त्यानंतर यशाची गुरुकिल्लीच जणू गवसली व यश मिळत गेले.
‘आवारा’ चित्रपटाने भारतातच नव्हे तर सोव्हियत युनियन (तत्कालीन) चीन, अफगाणीस्तान तुर्की देशातही यश मिळवले मध्य आशियाचा एक लोकप्रिय अभिनेता म्हणून राज कपूरला ओळख प्राप्त झाली सोबतच लोकप्रिय झाली ती राजकपूर आणि नर्गिस यांची जोडी या जोडीची केमिस्ट्री अफलातून होती व रसिकांवर जोडीने जणू गारूड केले असा तो काळ 1955 चा श्री 420 आणि 1956 चा चोरी चोरी यांनी आगळा इतिहास घडवला.
नंतर गाजलेली चित्रपट म्हणजे संगम राजेंद्रकुमार,वैजयंतीमाला व राजकपूर आणि प्रेमाचा त्रिकोण… हो त्रिकोण आजपर्यंत हिंदी चित्रपटांना कथा पुरवताना दिसतो.


2 मध्यांतरे असणारा मेरा नाम जोकर या चित्रपटानं राजकपूर याचं आर्थिक गणित कोलमडलं मात्र खचून न जाता आपला मुलगा ऋषी कपूरला घेउन डिंपल कपाडिया सोबत काढलेल्या ‘बॉबी’ मधून राजकपूर यांनी पुन्हा गगन भरारी घेतली.
1970 ते 80 मध्ये सत्यम शिवम् सुंदरम, प्रेम रोग, राम तेरी गंगा मैली अशा सुपरहिट चित्रपटांसह नवे चेहरे रुपेरी पडद्यावर आणण्याचे व हिट करण्याचं काम देखील तितकच महत्वाचं आणि या चित्रपटातून सामाजिक प्रश्न देखील नेमकेपणने मांडण्याचं काम केलं हे विसरता येणार नाही
पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या राजकपूर यांनी जे चित्रपटांना दिलं ते अतिशय अनमोल आहे सोबतच पुढच्या पिढीतील वारसा येण्याच्या आधी भाऊ शशीकपूर, शम्मी कपूर यांनीही वेगळी ओळख निर्माण केली. त्यापुढच्या पिढीत रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर व नंतर करिष्मा कपूर, करिना कपूर, रणबीर कपूर अशी खूप मोठी जंत्री सांगता येईल.
दुसऱ्या बाजूला कपूर घराण्यातीलच सुरिदंर कपूर, बोनी कपूर,अनिल कपूर,संजय कपूर असा उल्लेख करताना अगदी सलमा आगापर्यंत कपूर घराण्याचे वारस..…. जन्मशताब्दी वर्षात पुन्हा एकदा राजकपूर ERA डोळ्यासमोर आणावा व बघावा लागणार आहे.


प्रशांत विजया अनंत दैठणकर

(जिल्हा माहिती अधिकारी, बीड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]