*सकारात्मक पत्रकारिता काळाची गरज : राज्यपाल भगतसिंग कोशियारी*

0
296

राजभवनात पार पडले व्हॉइस ऑफ मीडियाच्या वेबसाईटचे लोकार्पण तथा पदग्रहण सोहळा

मुंबई, दि. ७ : सध्याच्या काळात पत्रकारितेचे व्रत कठीण आहे. तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे पत्रकारितेचे काम सध्या झाले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया, वेब पोर्टल आदी माध्यमांचा सदुपयोग आणि उपयोग यातील फरक समजून घेतला पाहिजे सध्याच्या युगात सकारात्मक आणि विकासात्मक पत्रकारिता नितांत गरजेची आहे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी केले. जर  बी चांगले असेल तर झाड चांगलं होते आणि झाड चांगलं असेल तर त्याची फळेही चांगले येतात याच दृष्टिकोनातून मीडियाचे काम राज्यभरासाठी आणि देशभरासाठी चांगले आहे. ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून पत्रकारितेची एक चांगली पिढी तयार होईल, पत्रकारांचा एक नया आगाज यहा से होगा अशा विश्वास देखील यावेळी राज्यपाल महोदयांनी व्यक्त केला

राजभवनातील जलविहार सभागृहात पार पडलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’वेबसाईट उद्घाटन समारंभ तथा पदग्रहण सोहळ्याला संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, प्रदेशाध्यक्ष राजा माने व संघटनेचे संस्थापक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी राज्यपालांच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडियाच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. तसेच काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, यामध्ये सारिका महोत्रा, आरोग्य सेलचे राष्ट्रीय संचालक दिनेश मुतुला, राज्य उपाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य संघटक सुधीर चेके पाटील व उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती हरून अ. कादिर खाटीक यांचा समावेश होता.

प्रारंभी श्री पुप्पाला यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या योजनांची माहिती दिली, तर प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी  ही संघटना देशभरातील २० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन निर्माण केलेली  असल्याचे सांगितले, पत्रकारितेला नवा आयाम देण्याचे काम व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना देशभर करेल असा विश्वास देखील त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केला.

सुरुवातीला राज्यपाल महोदयांनी दीप प्रज्वलन केले तसेच राष्ट्रगीताने सुरू झालेला या कार्यक्रमाचा समारोप देखील राष्ट्रगीताने झाला.

प्रसंगी ऋषिकेश जोशी जोशी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले संघटनेच्या कार्यालय सचिव दिव्या पाटील यांनी आभार मानले.

राज्यपालांना भावली शपथ

व्हाट्सअप मीडियाच्या वतीने यावेळी राज्यभरातून आलेल्या पत्रकारांना नितीन मुले जपण्याची व राष्ट्रभावना वाढीस लागण्या संदर्भात कार्य करण्याची शपथ देण्यात आली राज्यपाल व शहरी यांना ही शपथ खूपच आवडली त्यांनी ही शपथ केवळ पत्रकारिते पुरती मर्यादित नसून ती समाजातील सर्व घटकांना लागू पडते अशा शब्दात गौरव केला.

पत्रकारांनी मारला राजभवनाला फेरफटका

संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभरातील विविध वृत्तपत्रांचे 150 पत्रकार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते अडीच तास राजभवनाच्या परिसरातील विविध वास्तू व निसर्ग सौंदर्याची पत्रकारांनी पाहणी केली.

 ………………………..

फोटो ओळ: ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या वेबसाईट उद्घाटन समारंभ तथा पदग्रहण राज्यपाल भगतसिंग कोशियारी  यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केले. संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, प्रदेशाध्यक्ष राजा माने व संघटनेचे संस्थापक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य उपाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य संघटक सुधीर चेके पाटील व उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती हरून अ. कादिर खाटीक यांचा समावेश होता.

 …………………………………

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here