29 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeराजकीय*संविधान बचाव संघर्ष यात्रा*

*संविधान बचाव संघर्ष यात्रा*

*पहिला टप्पा – नागपूर ते धुळे*

*दि. २ मार्च ते ७ मार्च २०२४*

*समाजवादी पार्टी मुंबई व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. अबू आसिम आझमी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे व सर्व राज्यस्तरीय पदाधिकारी यांची राज्यस्तरीय ●संविधान बचाव संघर्ष यात्रा●* 

मुंबई ; दि.२७ ( वृत्तसेवा ) -“आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीच्या वतीने संविधान बचाव संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

देशात सध्या सुरू असलेल्या घटनाबाह्य अघोषित आणिबाणीच्या विरोधात आणि आगामी निवडणूका या देशाच्या घटनेनुसार व उद्दिष्टानुसार कोणत्याही दहशतीविना व धार्मिक सांप्रदायिक तणावमुक्त भयमुक्त वातावरणात झाल्या पाहिजेत. खऱ्या अर्थाने लोकशाही हक्कांची अंमलबजावणी होण्यासाठी इव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकांचा वापर झाला पाहिजे.

वाढती महागाई व बेरोजगारीला प्रखर विरोध, शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव, महिला, दलित, ओबीसी व अल्पसंख्यांक वर्गाला सन्मान या मूलभूत व दैनंदिन गरजेच्या प्रश्नांवर मतदान झाले पाहिजे. या व अन्य सर्व संविधानिक मूल्यांचे रक्षण, प्रचार व प्रसार यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेमध्ये महाराष्ट्रातील समाजवादी पार्टीचे मुंबई व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. अबू आसिम आझमी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे, प्रधान महासचिव परवेझ सिद्दीकी व मेराज सिद्दीकी, प्रवक्ता एड. रेवण भोसले, महिला नेत्या मायाताई चौरे व साजिदा निहाल अहमद, युवा नेते फहाद अहमद, किसान सभा प्रमुख शिवाजी परुळेकर, उपाध्यक्ष डॉ. पी डी जोशी पाटोदेकर, महासचिव डॉ. विलास सुरकर, अब्दुल राऊफ, व अन्य सर्व राज्यस्तरीय पदाधिकारी व नेते सहभागी होणार आहेत.” असे जाहीर प्रसिद्धीपत्रक कार्याध्यक्ष प्रताप होगाडे, प्रधान महासचिव परवेझ सिद्दीकी व प्रवक्ता एड रेवण भोसले यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 

*● संविधान बचाव संघर्ष यात्रा*

*संविधानके सन्मानमे, समाजवादी मैदानमे* 

  • मनुवादी फॅसिझमके खिलाफ – संघर्ष यात्रा 
  • संविधान तथा लोकशाहीकी रक्षाके लिये – संघर्ष यात्रा 
  • महंगाई, भूख, भय, भ्रष्टाचार और अन्यायके खिलाफ – संघर्ष यात्रा 
  • बेरोजगार, महिला, किसान, अल्पसंख्यांक, ओबीसी और दलितोंके सन्मानके लिये – संघर्ष यात्रा 

*● देशकी मांगे, जनताकी मांगे -*

  • इव्हीएम हटाओ, बॅलट पेपर लगाओ।
  • महंगाई हटाओ, गरीबोंको बचाओ ।
  • युवाओंको रोजगार – मिलनाही चाहिये । 
  • किसानोंको सही दाम – मिलनाही चाहिये । 
  • सांप्रदायिकताको खतम करो । 
  • जाती और धरमके नामपे लोगोंका बंटवारा बंद करो ।
  • महिला, दलित, ओबीसी, अल्पसंख्याक इनपे हो रहे अन्याय, अत्याचार, बलात्कार बंद होने चाहिये । 
  • महिलाओंको सन्मान चाहिये । 
  • संविधान तथा लोकशाहीको मजबूत बनाओ । 
  • महाराष्ट्रको गुंडाराज होनेसे बचाओ । 
  • सीएए कानून नही चाहिये । 
  • तानाशाही खतम करो । 

*●यात्रा कार्यक्रम -*

सदरची यात्रेचा प्रारंभ शनिवार दि. २ मार्च रोजी नागपूर येथून होईल. नागपूर मध्ये कार्यकर्ते बैठक, पत्रकार परिषद व सायंकाळी गरीब नवाज मैदानावर जाहीर सभा होईल. रविवार दि. ३ मार्च रोजी अमरावती येथे कार्यकर्ते बैठक, पत्रकार परिषद व सायंकाळी मंगरुळपीर जिल्हा वाशीम येथे जाहीर सभा होईल. सोमवार दि. ४ मार्च रोजी अकोला येथे कार्यकर्ते बैठक, पत्रकार परिषद व सायंकाळी झुल्फिकार दर्गा मैदानावर जाहीर सभा होईल. मंगळवार दि. ५ मार्च रोजी बुलढाणा येथे कार्यकर्ते बैठक, पत्रकार परिषद व सायंकाळी जळगांव जामोद येथे जाहीर सभा होईल. बुधवार दि. ६ मार्च रोजी जळगांव येथे कार्यकर्ते बैठक, पत्रकार परिषद व सायंकाळी जामनेर येथे जाहीर सभा होईल. गुरुवार दि. ७ मार्च रोजी धुळे येथे कार्यकर्ते बैठक, पत्रकार परिषद व सायंकाळी जाहीर सभेने या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल. 

___

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]