- *भारताच्या प्रगतीमध्ये स्वच्छतेची खूप मोठी भूमिका – इंधन प्रबंधनातून शाश्वत विकास संस्थात्मक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन*
लातूर : सोमवार दि. १२ जुलै रोजी ‘संरक्षण से स्वच्छता ‘ या विषयावरती पीसीआरए यांच्यावतीने व्हर्च्युअल संस्थात्मक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले, त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक पी. टी. देवतळे, पीसीआरए पुणे संयुक्त निर्देशिका व उपप्रादेशिक अधिकारी स्वाती कुमारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य मार्गदर्शक पीसीआरए चे व्याख्याता केदार खमितकर लातूर होते. घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. यातले बरेचसे प्रश्न हे निकृष्ट राहणीमान असल्यामुळे निर्माण होत असतात. याबद्दल समाजामध्ये जाणीव जागृती करणे महत्त्वाचे आहे असे सहसंचालक पी. टी. देवतळे यांनी स्वच्छतेविषयी मनोगत व्यक्त केले. पीसीआरए च्या पर्यावरणीय स्वच्छता चळवळीतील उद्दीष्ट, ” अनावश्यक खर्च कमी करा, पुन्हा वापरा, पुनर्वापर करा” मानवी जीवनासाठी या तीन कृती कचरा कमी करण्यावर केंद्रित असल्याचे ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर यांनी सांगितले. पर्यावरण सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन वरती उपलब्ध संधींबाबत केदार खमितकर यांनी सुयोग्य मार्गदर्शन केले. कच्चा माल आणि ऊर्जेच्या संवर्धनातून किंवा उत्पादनांचा पुनर्वापर आणि पुनर्वापर करण्याद्वारे. आपण काय खरेदी करता हे पाहणे, स्वतःचे पॅकेजिंग पुरवणे आणि आपण खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूचे कार्य आपल्यासाठी उपयुक्त नसल्यास काळजीपूर्वक विचार करून कचरा कमी करण्यात आपण आपली भूमिका करू शकता. आपण विकसित करू शकता अशा साध्या सवयी देखील आहेत ज्यामुळे आपण कमी पाणी आणि वीज वापरु शकाल. हिरवागार असणे हे वेळखाऊ नाही यामुळे आपल्या पैशाची बचत होते आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय देऊन समाधानाची भावना मिळते.परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे असे खमितकर यांनी नमूद केले. पीसीआरए यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर १- १५ जुलै २०२१ दरम्यान ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे.प्रास्ताविक प्राचार्य हेमंत आवारे औ.प्र.संस्था नागपूर यांनी केले तर सूत्रसंचालन सीमा महाजन प्राचार्या औ.प्र.संस्था (मुलींचे) यांनी केले. वेबिनार मध्ये विदर्भ, मराठवाडा विभागातील औ.प्र. संस्थेचे प्रशिक्षणार्थी, इन्स्ट्रक्टर आदी वेगवेगळ्या ठिकाणाहून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.