लातूर;
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षकांचा 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभाग वाढावा म्हणून 95 कथाकथन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत .त्यापैकी जि.प.कें.प्रा.शा.कासारखेडा या शाळेत आज ९५वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर आयोजित संमेलन आपल्या दारी अंतर्गत कथाकथन सौ.वृषाली पाटील यांनी मैत्री या कथेने केले. संमेलना विषयी सविस्तर प्रास्ताविक व बालकाव्य वाचन सौ.नयन राजमाने यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व साहित्यिक परीचय सौ.सविता धर्माधिकारी यांनी केले.कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवने व्यंकटेश व केंद्रप्रमुख श्री.हुसेन शेख २०० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
दुसरा कार्यक्रम जि.प.प्रा.शा.मळवटी या शाळेत आज ९५वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर आयोजित संमेलन आपल्या दारी अंतर्गत कथाकथन व काव्यवाचन कार्यक्रम आयोजित केला. संमेलना विषयी सविस्तर उत्कृष्ट प्रास्ताविक व बालकाव्य सौ.नयन राजमाने यांनी चिंच ही बालकविता सादर केली .वृषाली पाटील यांनी उत्कृष्ट कविता सादर केली .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवाजी साखरे सर यांनी केले. “आई तू का ऐकून घेतलंस” विद्यार्थ्यांना शाळासुटण्याच्या वेळीही खिळवून ठेवणारी कथा सौ.सविता धर्माधिकारी यांनी सांगितली .कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी साखरे , विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते.