17.2 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीयसंभाजीराव पाटील निलंगेकर यांची विजयाची हॅटट्रिक

संभाजीराव पाटील निलंगेकर यांची विजयाची हॅटट्रिक


13 हजार 740 मतानी विजयी, निलंग्यात जल्लोष
निलंगा विधानसभेवर पुन्हा निलंगेकर विजय


निलंगा ;( माध्यम वृत्तसेवा):– निलंगा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे 13 हजार 740 मतांनी विजयी झाले. तर काँग्रेसचे प्रतिस्पर्धी अभय साळुंके 98 हजार 628 मताधिक्य घेऊन द्वितीय क्रमांकावर राहिले. तर वंचितचे मंजुषा निंबाळकर तिन हजार 898 मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. यामुळे निलंग्यात पुन्हा कमळ फुलले आहे. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे.


निलंगा विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत अभय साळुंकेचा जरी पराभव झाला असला तरी त्यांनी 98 हजार 628 आपल्या पारड्यात मते पाडून घेतले. तर आकाश पाटील 979 ,ज्ञानेश्वर कांबळे 804 ,नागनाथ बोडके 1388 , हनुमंत धानुरे 430 , अन्वर हुसेन सय्यद 79 , दत्तात्रय सूर्यवंशी 186 , दत्तात्रय सूर्यवंशी 103 , निळकंठ बिरादार 198, फैज मिया शेख 603 , मेहबूब पाशा मुल्ला 294 मते मिळाली. तर नोटाला 915 मते पडली आहेत. असे एकूण 2 लाख 17 हजार 238 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

यात भाजपाचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना 1लाख 12 हजार 368 मते पडल्याने त्यांचा 13 हजार 740 मतांनी विजयी झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत चौका चौकात फटाक्याची आतषबाजी करत गुलाल उधळून पेढे वाटत आनंद साजरा केला. औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत शहरामध्ये विजय जल्लोष साजराा करण्यात आला ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या जल्लोष मध्ये हातात भारतीय जनता पार्टीचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. पहिल्या फेरीपासूनच माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना मताधिक्याची लीड मिळत होती. यामध्ये निलंगा शहर व मतदार संघातील मोठे गावांमध्ये फारशी मताधिक्य मिळाले नाही. निलंगा विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर विजयी झाले तर तिसऱ्यांदा विजयी होऊन त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला होता प्रारंभी पोस्टल मताची मोजणी झाली निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांनी संभाजी पाटील निलंगेकर हे विजयी झाल्याचे घोषित केले.

हा विजय जनतेला व कार्यकर्त्यांना समर्पित

  • आ.संभाजीराव पाटील निलंगेकर निलंगा: निलंगा मतदार संघातील निलंग्यासह देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नागरिक व मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी केले.या विजयासाठी मतदारसंघातील नागरिक व भाजपा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.हा विजय मी त्यांनाच समर्पित करतो,अशी भावना निलंगा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.
    ही निवडणूक सोपी नव्हती. बाभळगावकर मंडळींनी मागील वर्षभर निलंग्यासह जिल्ह्यात अपप्रचार करत दिशाभूल चालवली होती.जनता त्या अपप्रचाराला भुलली नाही.महायुतीवर विश्वास व्यक्त करत जिल्ह्यातील सहापैकी पाच जागी महायुतीला मतदारांनी विजयी केले.हे संपूर्ण यश मतदार संघातील व जिल्ह्यातील जनता आणि कार्यकर्त्यांचे आहे.जनतेने विकासाला पाठबळ दिले. यामुळे आगामी काळात आमची जबाबदारी वाढली आहे.जनतेच्या विश्वासाला पात्र राहून काम करू,असेही आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]