अंतर्मनातील प्रभू प्रेमाची ऊर्जा आत्मज्ञानाची प्राप्ती करून देते
………………………………..
हभप श्री ज्ञानराज महाराज
…………………………………
औसा, ( अँड.शामराव कुलकर्णी यांजकडून):-मनुष्य कर्म करीत असताना ते अपेक्षा विरहित आणि वासना शिवाय असणे गरजेचे तर आहेच,पण मन ध्यान चित्त बुद्धी आणि दृढविश्वास यातून केलेले नामस्मरण,भगवंत चिंतन , नामस्मरण आणि गुरूसेवा ही ऊर्जा जीवाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देते असे विचार ह भ प श्री ज्ञानराज महाराज यांनी व्यक्त केले.
औसा येथील नाथ मंदिरात पूज्य गुरुबाबांच्या श्रावणमास अनुष्ठान सोहळ्यात नित्य सायंकाळी चक्रीभजनानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी वरील प्रवचनात महाराज बोलत होते
तेसा कर्तुत्वाचा मदु, आणि कर्म फळाचा आस्वादू , या दोहीचे नाव बंधू , कर्माचा की,…. तरी या दोहीचा विखी , जैसा बापूं नातळे लेकी,तेसा हो न शके दुःखी , विहित क्रिया ,……
या 18 व्या अध्यायातील 9 व्या श्लोकातील ओवी क्रमांक 5 / 6
यावर चिंतन मांडताना महाराज म्हणतात जन्म मृत्यूच्या मध्ये कर्म आहेत ते कर्म मनुष्य जीवाला करणे कर्मप्राप्त आहे हे कर्म करताना अंतकरणात सदैव प्रभू प्रेम नामस्मरण भक्ती ची ज्योत प्रज्वलित असेल तर हीच ऊर्जा आपल्याला आत्म स्वरूप जाणून घेण्याची क्षमता निर्माण करते आणि आत्मज्ञानाचा लाभ होतो.

त्यागआणि संन्यास एकसमान वाटत असतील तरी यात फरक आहे त्याग विशिष्ट वेळी प्रसंगी विशिष्ट गोष्टीचा असू शकतो तेच संन्यास म्हणजे संपूर्ण विरक्ती जीवनाचे प्रतीक असे मानले जाते म्हणून कुठल्याही प्रलोभन सुख याची उपलब्धता असून त्याचा अव्हेर करून त्याची कणभरही इच्छा अपेक्षा उरली नाही ज्याचे संपूर्ण जीवन व कर्म हे भगवंत उपासनेत समर्पित झाले ते जीवनच वीरक्त व संन्यासी म्हणावे. अन्यथा क्षणिक वैराग्य याला संन्यास वृत्ती म्हणता येणार नाही.
उठता बसता फिरता काम करता आपले मन ध्यान आणि चित्त भगवंताशी जोडलेले हवे त्याचे नामस्मरण ध्यान अंतरंगात साठवावे कारण तो हे सारे पाहतो ऐकतो प्रत्येक अणु रेणू वृक्षवल्ली सगळीकडे तो चराचरात सूक्ष्म स्वरूपात व्यापून उरला आहे जेव्हा मनाचा हा दृढ विश्वास असेल आणि त्याच्या ध्यान नाम आणि सेवेत प्रेम आणि निष्ठा असेल तर निश्चितपणे
तो ईश्वर परमात्मा आपल्यावर कृपा करतो असे श्री ज्ञानराज महाराज म्हणाले. म्हणून चांगले काम कर्म आणि अंतकरणात भगवंताचे चिंतन हे असेल तर कर्म आणि नाम हेच मोक्षाचे द्वार आहे असे महाराजांनी स्पष्ट केले. यासाठी इंद्र रुपी माकडांना काबुत ठेवणे विषयांध माकडांना नियंत्रित ठेवून जागृत मनाने जीवनात नित्यनेमात असाल तर हा सुंदर असा मानव देहरुपी बगीचा सुरक्षित सुंदर आणि टवटवीत राहू शकतो हा विश्वास महाराजांनी दिला
दुसऱ्या श्रावण सोमवारी नाथ मंदिरात चक्रीभजनात अत्यंत उत्कृष्ट तालबद्ध डीमडी वाजवण्याची सेवा करतात असे श्री संभाजी औटी , त्रिवेनाबाई डोके खरोसा, शिंदे आदींची माळ सेवा होती.