औसा – शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम प्रयतशील असलेले आमदार अभिमन्यू पवार यांनी नुकतीच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत संततधार पावसामुळे लातूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत २९० कोटींचा नुकसानभरपाईचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तरी मदत घोषित होण्याच्या प्रतीक्षेत असून तसा शासकीय निर्णय लवकर काढण्याची मागणी आ. अभिमन्यू पवार यांनी केली आहे.
संततधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील ३.४२ लक्ष शेतकऱ्यांच्या २.१३ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले असून २९० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे.. लातूर जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळातील संततधार नुकसानग्रस्त शेतकरी मदत घोषित होण्याच्या प्रतीक्षेत असून तसा शासकीय निर्णय लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावा अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे.यासाठी सरकार सकारात्मक असून पुढील काही आठवड्यात आदेश निर्गमित होतील असा विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे.शेतकऱ्यांच्या न्यायिक हक्कासाठी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आ. अभिमन्यू पवार हे सातत्याने पाठपुरावा करीत असतात त्यामुळे अल्पावधीत शेतकरी हिताचे अनेक योजना त्यांनी मतदारसंघात यशस्वी राबविल्या आहेत.