इचलकरंजी : (प्रतिनिधी)खोतवाडी येथे श्री दानम्मादेवी याञेनिमित्त रविवार दि.१ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
खोतवाडी येथील श्री दानम्मादेवी व श्री वीरभद्र मंदिर हे जागृत देवस्थान असून येथे येणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात,अशी भाविकांची दृढ श्रध्दा आहे.श्री दानम्मादेवी व श्री वीरभद्र देवाच्या दर्शनासाठी गुरुवारी तसेच अमावस्या व विविध सणाच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते.
श्री दानम्मादेवी व श्री वीरभद्र देवाच्या याञेनिमित्त रविवार
दि.१ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता श्री दानम्मादेवी व श्री विरभद्र देवाच्या मूर्तीवर अभिषेक व मूर्तीची विधीवत पुजाअर्चा , सकाळी ११.३० वाजता सुवासिनी पुजन , दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद वाटप , सायंकाळी ६ वाजता पालखी सोहळा , महाआरती व दीपोत्सव असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा , असे आवाहन श्री वीरशैव लिंगायत नागलीक ( बनगार ) उत्कर्ष मंडळाच्या वतीने अध्यक्ष सुभाष घुणकी , उपाध्यक्ष प्रमोद हाळभावी , सेक्रेटरी शिवकुमार मुरतले , खजिनदार राजेंद्र भावीकट्टी
यांनी केले आहे.