लातूर :श्री गुरूजी आयटीआयची शेवटच्या वर्षाची नुकतीच परिक्षा संपली आहे. परिक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच श्री गुरूजी आयटीआयचे विद्यार्थी विविध नामंकित आस्थापनात अप्रेंटिसशिप ट्रेनिंग म्हणून नौकरीस लागले आहेत.
श्री गुरूजी आयटीआय च्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विविध नामांकित कंपण्याच्या वतीने कॅंपस इंटरव्यू घेतले जातात. या वर्षी कॅंपस मध्ये सर्वच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विविध आस्थापनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यापैकी कौस्तुभ पाटील व वेदांत कुलकर्णी यांची इलेक्ट्रिकल क्षेत्रातील नावाजलेली इन्फायनिटी इंजिनिअरींग कंपनी पुणे येथे ॲप्रेंटिसशिप ट्रेनिग म्हणून निवड झाली आहे . त्याबद्दल या दोनही विद्यार्थांचे श्री गुरूजी आयटीआयच्या वतीने संस्था अध्यक्ष अभियंता अतुल ठोंबरे यांनी पुष्पगुच्छ देऊन पेढे वाटून अभिनंदन केले.
यावेळी संचालक रविकांत मार्कंडेय, समर्थ पिंपळे, अजय होलगे, अक्षय जोशी, माधवी पाटील, विकी हुलकुद्रे, प्रणव गुराळे, विकास घडके, प्रविण फत्तेपूरकर आदी उपस्थित होते.
शंभर टक्के अभ्यासक्रम, शंभर टक्के प्रात्येक्षिक,ऑन जाॅब ट्रेनिंग वर्षातून तीन अभ्यास सहली, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासा येथे केला जातो.
सोबत आत्मनिर्भर होण्यासाठीचे तंत्रशिक्षणाचे बाळकडू श्री गुरूजी आयटीआय मध्ये दिले जाते. त्याचाच परिणाम म्हणून श्री गुरूजी आयटीआयचे विद्यार्थी तंत्रक्षेत्रात पूर्ण भारतभर उतुंग भरारी घेत आहे.