लातूर:शासनाच्या नियमाप्रमाणे श्री गुरूजी आयटीआय मध्ये ऑनलाईन प्रवेश फाॅर्म प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. यास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.निखिल गोकुळे यांनी श्री गुरूजी आयटीआय मध्ये पहिला ऑनलाईन प्रवेश फाॅर्म भरल्या बद्दव संस्था अध्यक्ष अतुल ठोंबरे यांनी त्याला काॅम्प्युटर जनरेट फॅार्म देऊन सत्कार केला. यावेळी प्राचार्य संजय अयाचित, जी.टी.जोशीसर, होळकर सर, माधवी पाटील, अजय होलगे, समर्थ पिंपळे,प्रणव गुरले, विकास घोडके, प्रविण फत्तेपूरकर उपस्थित होते.

श्री गुरूजी आयटीआयचा मागील तीन वर्षात ९० टक्केपेक्षा जास्त निकाल लागला आहे. शंभर टक्के प्लेसयमेंट, अभ्यस सहलीचे आयोजन केले जाते. ऑन जाॅब ट्रेनिक मधे विद्यार्थी भाग घेतात. आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, फिटर, फिजिओथेरपी, इंग्रजी स्टेने हे अभ्यासक्रम आहेत.श्री गुरूजी आयटीआय मध्ये ऑनलाईन प्रवेश फाॅर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना सोय व्हावी यासाठी स्वतंत्र प्रवेश कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षा मध्ये आयटीआय प्रवेशाची माहिती देण्यासाठी तज्ञ प्राध्यापकांची नेमनुक करण्यात आली आहे. ऑनलाइन प्रवेश फाॅर्मभरण्यासाठी सुसज्य संगणक कक्षाची सोय करण्यात आली आहे.