कोविडच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करू-उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांचा इशारा..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-देशभरात सद्यस्थितीला कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरियंटने धुमाकुळ घातला असून रूग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने नागरिकांची लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.त्याचबरोबर शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे सर्वांनी स्वत:ची जबाबदारी म्हणून काटेकोर पालन करावे.कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी दिला.
निलंगा विभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित पञकार परिषदेत त्या बोलत होत्या.याप्रसंगी निलंगा तहसीलदार गणेश जाधव उपस्थित होते.उपविभागीय अधिकारी शोभा जाधव म्हणाल्या,कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता.दुसर्या लाटेच्या वेळी ज्या कोणत्या उणीव जाणवल्या त्याची पुर्तता प्रशासनाकडून करण्यात आली आहे.लाट थोपविण्यासाठी संपूर्ण यंञणा सज्ज झाली आहे.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतत पालन केले जात आहे.लवकरच शहरातील कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.त्याची पाहणी आम्ही नुकताच केली आहे.आज रोजी निलंगा तालुक्यात चार रूग्ण पाॅझिटीव्ह असले तरी येणार्या काळात आकडा वाढण्याची शक्यता आहे.कोरोना पासून बचावासाठी नियमांचे पालन व लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याने सांगितले.निलंगा ग्रामीणमध्ये 59 टक्के लसीकरण तर शहरात 99.59 टक्के लसीकरण झाले आहे.15 ते 18 वयोगटातील 16 हजार पाञ विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 343 जणांना पहिला डोस देण्यात आला.
———————————————————————
आँक्सिजनच्या बाबतीत निलंगा तालुका स्वंयपूर्ण : उपविभागीय अधिकारी शोभा जाधव
कोरोनाच्या दुसर्या लाटेत सर्वात जास्त आँक्सिजनसाठी प्रशासनाची पळापळ झाली.परंतु,सध्या निलंगा उपजिल्हा रूग्णालयात दोन आँक्सिजन प्लांट तर हलगरा येथील हनुमान खांडसरी येथे एक प्लांट उभारण्यात आल्याने आँक्सिजनच्या बाबतीत निलंगा तालुका स्वंयपूर्ण झाल्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगत आजरोजी निलंगा उपजिल्हा रूग्णालयात 280 आँक्सिजन बेड व खाजगी रूग्णालयात 40 असे एकूण 320 आँक्सिजन बेडची उपलब्धता असल्याचे त्यांनी सांगितले.
———————————————————————