पुणे , २३ मे २०२२ : बीएएसएफने आज शुभारंभ केलेल्या एक्सपोनस किटकनाशकाच्या साह्याने भारतातील शेतकरी त्यांच्या पिकांचे रक्षण करू शकतील आणि उत्पादनक्षमता वाढवू शकतील. ह्या महत्त्वाकांक्षी रसायनाला एका वैशिष्टपूर्ण फॉर्म्युलेशन मधील ब्रोफ्लानीलाईड ह्या नवीन सक्रीय घटकाची शक्ती मिळालेली आहे.
प्रमुख कीटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन कार्यपद्धती असणारे एक्सपोनस हे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अळी व कीटक यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रमाचा भाग म्हणून वर्तमान रसायनं विरुद्ध निर्माण झालेल्या प्रतिकारशक्ती वर मात करण्यासाठी एक दमदार वेगवान व बहुआयामी साधन आहे . एक्सपोनस हे अळीवर्गीय व फुलकिडे सारख्या त्रासदायक कीटकांपासून मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या तेलबिया डाळवर्गीय व भाजीपाला पिकांमध्ये प्रभावशाली व दीर्घकाळ संरक्षण मिळवण्यासाठी शिफारस करण्यात येते.
नारायण कृष्णमोहन, व्यवस्थापकीय संचालक, बीएएसएफ इंडिया लिमिटेड म्हणाले, ‘‘आता पीक संरक्षण क्षेत्रातील आमच्या अत्याधुनिक संशोधनामुळे भारतातील शेतकऱ्यांना लाभ होईल. शेती हे पृथ्वीवरील सर्वात महान काम आहे. बीएएसएफ येथे आम्ही शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी त्यांच्या काम करण्यासाठी व त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी समर्पित असतो, जेणेकरून जीवजंतूंपासून पिकाचे संरक्षण करणे आणि उत्पादनक्षमतेला चालना देणे यासारख्या फार मोठ्या आव्हानांना यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी त्यांना मदत व्हावी म्हणून आम्ही आमच्या कौशल्याचा वापर करतो.’’
किटकनाशकांच्या संपूर्णत: नवीन गटाचे (ग्रुप ३०-मेटा डायमाईड्स आणि आयसोग्झॅझोलाइन्स) प्रतिनिधीत्व करणाऱ्या नवीन आयआरएसी ग्रुप ३० द्वारे बाजारपेठेत सादर करण्यात आलेल्या पहिल्या संयुगांपैकी एक, एक्सपोनस असे कीटनाशक आहे की ज्याला बाजारपेठेत सध्या उपलब्ध असणाऱ्या कीटकनाशकांबरोबर क्रॉसरेझिस्टन्स नाही. याच कारणामुळे हे एक श्रेष्ठ दर्जाचे इन्सेक्टिसाइड रेझिस्टन्स साठी व्यवस्थापन साधन आहे.
एक्सपोनस ह्या किटकनाशकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे जलद गतीने पसरून व झटपट कार्य करून वेगवेगळ्या टप्यांवरील वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांवरील अनेक प्रकारच्या किटकांवर झटपट नियंत्रण मिळवून अत्यंत चिवट प्रतिकारशक्ती झालेल्या किटकांवर सुद्धा परिणामकारक होण्याची क्षमता.
‘‘वर्तमान मानकांच्या (प्रमाणांच्या) तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात वापर करून वर्तमान आणि नव्याने निर्माण होणाऱ्या किटकांच्या अनेक प्रकारांचे व्यवस्थापन करण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बीएएसएफच्या वचनबद्धतेची ह्या संशोधनामुळे पुन्हा एकदा पुष्टी होते. एकस्पोनस वापर केल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या पिकांमधील कीटकांविरूध्द प्रभावी व दीर्घकालावधीचे संरक्षण मिळविण्यासाठी मदत होते’’ असे श्री राजेन्द्र वेलागाला, बिझिनेस डायरेक्टर, ॲग्रिकल्चरल सोल्यूशन्स, साऊथ एशिया, बीएएसएफ म्हणाले.
‘‘एक्सपोनस हा संपूर्ण जगभरातील शेतकऱ्यांना सहाय्य करू शकेल असा कीटकनाशकांचा पोर्टफोलिओ निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतीय उद्योग आणि कृषीक्षेत्राला त्यांची क्षमता कमाल पातळीवर नेण्यास साह्य करण्यासाठी बीएएसएफ वचनबद्ध आहे. जास्त चांगल्या पिकाचे उद्दिष्ट गाठण्यास मदत करण्यासाठी सर्वात जास्त प्रगत उपाययोजना प्राप्त होणे ही भारतीय उत्पादकांची गरज आहे,’’ असे अविनाश देशमुख, व्हाइस प्रेसिडेन्ट, ॲग्रिकल्चरल सोल्यूशन्स, आशिया पॅसेफिक म्हणाले.