टोकन पद्धतीने तूर लागवड; भरघोस उत्पन्नाची हमी !! येरोळ येथील शेतकर्याचा यशस्वी प्रयोग
————————————
शिरूरअनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे सोयाबीन पिकात आंतरपीक म्हणून तुरीची टोकण पद्धतीने लागवड करुन आधुनिक तंञज्ञानाचा वापर करुन शेती मध्ये यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. यात विशेष म्हणजे तुरीवर सर्वत्र मर रोगाचा प्रादुर्भाव असताना या शेतात मर रोगाची कुठेच लागण झाली नाही व प्रत्येक तुरीच्या झाडाला शेंगा लगडल्याने शेंगाचेओझे तुरीला सोसवत नाही.
या सिता ९५ वाणाच्या तुर पिकामुळे शेतकऱ्याला भरघोस उत्पादनाची हमी मिळाली आहे.
नवीन तंत्रज्ञानानुसार सोयाबीन पिकात आंतरपीक म्हणून तुरीची टोकण पद्धतीने ६ सोयाबीन व १ ओळ तुरीची दोन फुटाच्या अंतराने लागवड केली आहे . या तूरीवर एकवेळस फवारणी केली असून आज रोजी प्रत्येक झाडाला दोनशे ते तीनशे शेंगा हमखास लगडल्या आहेत. कृषी सहाय्यक एम.ओ.मोदी व लातुर येथील गायञी सिड्स अॅण्ड पेस्टीसाईडचे कृषीदुत मा.एस,एस दरेकर साहेब , परभणीचे कृषी सल्लागार संजय देशमुख व आकडे यांच्या मार्गदर्शनात केलेला हा प्रयोग मला भरघोस उत्पन्न देणारा ठरला आहे.-