किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या उपस्थितीत
लातूरात जिल्हा भाजपाच्या वतीने
शेतकरी संवाद अभियानाचे आयोजन
लातूर दि.०७ :- भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा किसान मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथे गुरुवार ८ जुलै रोजी शेतकरी संवाद अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी जिल्ह्यातील भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या वतीने राज्यात शेतकरी संवाद अभियान सुरू करण्यात आले असून या अभियानांतर्गत दिनांक ८ जुलै २०२१ गुरुवार रोजी लातूर येथे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंदअण्णा केंद्रे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, पाशा पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदरील शेतकरी संवाद कार्यक्रम लातूर येथील एमआयडिसी भागात असलेल्या प्रणवश्री मंगल कार्यालयात होणार असून या कार्यक्रमास लातूर जिल्ह्यातील भाजपाचे सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधी विविध मोर्चा आणि आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे आणि किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे यांनी केले आहे.