लोकनेता
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
केंद्रीय मंत्री मा श्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शेतकऱ्यांच्या विकास कामांची.. डोळ्यांचे पारणे फेडणारी लोकार्पण व उद्घाटन सभा कर्तव्यदक्ष विरोधी पक्ष नेते मा श्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री मा श्री भगवंतजी खुब्बा यांच्या प्रमुख उपस्थितीत व तसेच आमदार मा श्री अभिमन्यूजी पवार व सर्व भाजपा कार्यकर्ते यांच्या सुनियोजनातून औसा येथे पार पडली.यातून खरी श्रध्दा,भक्ती, व शक्तीची प्रचिती पाहवयास मिळाली.हा त्रिवेणी संगम जणू आपसूकच मिळुन आला आसावा..कुठलीही निवडणूक नसताना एवढी मोठी सभा म्हणजे आमदार अभिमन्यूजी पवार यांनी शेतकऱ्यांसाठी जिवापार केलेल्या कार्याचं फलीतचं म्हणावे लागेल..केवळ 2 वर्षाच्या कालखंडात मुरब्बी राजकारण्यांनाही बोट चावायला लावणारी लोकप्रसिद्धी..हि काही पिढीजात मिळालेली नाही..यासाठी जनमाणसाच्या उरात जागा करावी लागते..आणि अभिमन्यू पवार यांनी तेच केलं..हा माणूस आमदार झाल्यापासून क्षणभर सुद्धा थांबला नाही..शारीरिक वेदना झेलत या व्यक्तमत्वाने कार्य केलं आहे.उगाचं घरी बसून काही गोष्टी होतं नसतात.मराठीत म्हण आहे..दे रे हरि..पलंगावरी..आणि त्यातल्या त्यात मातीतुन आलेल्या माणसाला संघर्षाविना काही मिळतही नाही..गावचा सरपंच देखील 5 वर्षातून एकदा देखील लोकांच्या अडचणी जाणून घेण्या करीता गावात फेरफटका मारत नाही..परंतु आमदार अभिमन्यूजी पवार हे आजतागायत बळीराजाच्या समस्या सोडवण्यासाठी गावोगावी व दारोदार गेलेले आहेत. या पूर्वी लोकांना आमदार कुठेतरी हायवे रोडने गाडीतुन बसून जाताना दिसायचा..जरी यदा कदाचीत तो दारी आला की समजून घ्यायचं की निवडणुका आलेल्या आहेत..पण अभिमन्यू पवार यांचं हे कार्य महाराष्ट्रातील ईतर आमदारांनाही जमिनीवर यायला भाग पाडत असल्याचं चित्र स्पष्ट दिसून येत आहे..
संधीचं सोन हे स्वतःसाठी नव्हे तर जनतेच्या भल्यासाठी केलं पाहिजे हि आदर्शवंत भावना येणाऱ्या काळात प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मनात रुजण्यास आता वेळ लागणार नाही..अभिमन्यूजी यांनी राजकीय गणित बदलेलं दिसतय. येणाऱ्या काळात जो जमिनीवर राहून जनतेची कामे करेल त्यालाचं लोक पसंती देतील हे म्हंटलं तर वावग ठरणार नाही..पहिलं राजकीय सट्टेबाजी ही गडीवरून,वाड्यावरून किंवा घराणेशाहीच्या विचारातून केली जायची..पण येणारा काळ हा कर्तृत्वाचा असेल..यातून हेच लक्षात येत..सर्व साधारण कार्यकर्ता ते आमदार झालेले अभिमन्यूजी पवार हे जरी आमदार असतील..पण त्यांनी एक कार्यकर्ता म्हणूनच लोकांची कामे केलेली आहेत..कारण त्यांची सुरुवात हि शून्यातून झालेली आहे..आणि जो व्यक्ती शून्यापासून सुरुवात करतो..त्यालाच खरी राजकीय व सामाजिक गणिते जमतात.. व यातुनच तैयार होत असतो एक लोकनेता अभिमन्यू पवार.
गिरीश तुळजापूरे