इचलकरंजी/ प्रतिनिधी -कारदगा गावचे सुपूत्र शितल महावीर पाटील यांनी पिलानी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स या शैक्षणिक संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.त्यांना डब्ल्यूएचओच्या चिफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांच्या हस्ते पीएचडीची पदवी प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
शितल पाटील हे कारदगा गावचे सुपूञ असून त्यांनी थेसिस कंडिशन मॉनिटरिंग ऑफ मिसाईलाईंन्ड रोटर सिस्टीम अँड द प्रेडिक्शन ऑफ रिमेनिंग यूजफुल लाइफ ऑफ रोलिंग इलेमेंट बेअरिंगस यावर आधारित
शोध प्रबंध सादर केला आहे.या शोध प्रबधांचा उपयोग असंख्य उद्योगांमध्ये रोटेटिंग मशिनरीची विश्वासहर्ता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.डॉ. पाटील यांनी आपल्या संशोधन काळात विविध वर्ल्ड फेमस प्रकाशनमध्ये आपले संशोधन सादर केले आहेत. त्यांच्या या योगदानाची दखल अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स प्रायोगिक तंत्रे आणि जर्नल ऑफ व्हायब्रेशन इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या जनमान्य संस्थांनी घेतली आहे.ह्या भरीव कामगिरीमुळे डॉ.शीतल पाटील हे एक उत्कृष्ट संशोधक म्हणून नावाजले जातात. जागतिक संशोधन संस्थांप्रमाणे भारत सरकारने देखील पंतप्रधान फेलोशिप देऊन त्यांना
सन्मानित केले आहे.ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवणारे डॉ.शितल पाटील हे पिलानी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स या शैक्षणिक संस्थेमधले पहिले संशोधक ठरले.या पीएचडी पदवीने बिट्स संस्था व डॉ.पाटील यांच्या शिरपेचात एक नवा मानाचा तुरा रोवला गेला.सध्या डॉ. शीतल पाटील हे एआय तज्ञ म्हणून जर्मन बॉश बेंगलोर कंपनीमध्ये कार्यरत आहेत.त्यांचे संशोधन कौशल्य व अनुभव याचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञान बनविण्यामध्ये ते पूर्णतेने व्यस्त आहेत. त्यांचा बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रॅक दुबई येथील प्राध्यापक पदाचा अनुभव देखील नोंद करण्यासारखा आहे.सध्या ते संशोधक तसेच एक कुशल मार्गदर्शक म्हणून बॉशमध्ये योगदान देत आहेत. त्यांना या पीएचडी प्रवासात मार्गदर्शक म्हणून डॉ.अरुण जलान, डॉ.अमोल मराठे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सीमाभागातील कारदगासारख्या ग्रामीण भागात डॉ. शीतल पाटील यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. ग्रामीण भागातूनच शिक्षण घेत ते आज ख्यातनाम संशोधक हा प्रवास करत असून नवीन तरुण पिढीला एक आदर्श आहे. त्यांच्या या वाटचालीत त्यांचे वडील महावीर पाटील आणि त्यांच्या आई उज्वला पाटील यांचे मोलाचे योगदान आहे.