राजेंद्र शहापूरकर
१९८७ च्या शेवटी शेवटी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये माझे मित्र आणि शिवसेनेच्या त्या काळातील एक तडफदार प्रस्थ व नंतर सिडको भागाचे पहिले नगरसेवक मोतीराम घडामोडे ह्यांच्या आग्रहावरून आम्ही साहेबांना भेटायला ‘मातोश्री’ वर गेलो होतो. गोवा शिवसेनेचा संस्थापक सदस्य असल्याने माझी साहेबांबरोबर पूर्वीपासून ओळख होती आणि ‘मातोश्री’ सुरक्षिततेच्या विळख्यात नव्हती. राजे, मोरे,दिलीप घाटपांडे ही मातोश्रीची माणसं माणसाळलेली होती. ओळख देत असत आणि पोलिसफाटा फारसा नसे … ९५ नंतर तो वाढला.
आम्ही सरपोतदार दादाच्या खेरवाडीतील कार्यालयाजवळच्या फोटोग्राफर बरोबर घेऊन गेलो होतो. मला आठवतं की त्याच दिवशी अहमदनगरच्या जिल्हाप्रमुखपदी चितळीच्या सुहास वहाडणे ह्यांची नियुक्ती करण्यात आली होती … त्यांच्या नियुक्तीपत्रावर मीच साहेबांची स्वाक्षरी घेतली होती (सुहास बाहेरच्या रूममध्ये होता त्याने दारातून माझ्या हातात दिले होते .. साहेबांच्या स्वाक्षरी साठी)असो.
आमची छान बेट झाली . भरपूर बोलणं झालं आणि निघतांना साहेबांना फोटोसाठी विचारले . साहेब आपल्या केसातून हात फिरवत म्हणाले , अरे आज मी केसांना कलप लावलेला नाही… मेकप नाही , फोटो घ्या पण चांगला आला नाही तर छापायचा नाही … काय आहे, म्हातारा , दुर्मुखलेला नेता कार्यकर्त्यांना चालत नाही. त्याच्या मनात एक इमेज असते त्याच्या नेत्याविषयी . त्या इमेजला तडा जाता कामा नये ! आम्ही फोटो घेतले आणि ते चांगले निघाले म्हणून छापले सुद्धा !!
एकीकडे हे चित्र , असा कन्सेप्ट आणि दुसरीकडे विद्यमान पक्षप्रमुख ! दुर्मुखलेला , गांजलेला , आजारी चेहरा आणि कायम कौतूक स्वतः च्या दुखण्याचे . यांना टेन्शन खाजवायला कसे मिळेल याचे आणि भीती स्वतःची खुर्ची कुणी हिसकावून घेणार नाही ना याची !
साहेबां सारखा मान हवा तर मग तुलना तर होणारच !!!
अप्रतिम.. आणि एकदम बरोबर लिहिलंत..