शिवरत्न पुरस्कार

0
377

 

तेजस धुमाळ शिवरत्न पुरस्काराने सन्मानित

लातूर,   तबला वादनात संपूर्ण महाराष्ट्रभर आपली ख्याती मिळवलेले, लातूर मधील मसला गावचे सुपुत्र, तालतपस्वी कै. शांतारामबुवा चिगरी यांचे पट्टशिष्य, लातूरचे कलावंत सुप्रसिद्ध युवा तबलावादक तेजस विश्वनाथ धुमाळ यांना शिवदर्शन फाउंडेशन द्वारा ‘शिवरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

शिवदर्शन फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा “शिवरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. या वर्षी संगीत- कला क्षेत्रातील कार्याबद्दल लातूरचे युवा कलावंत तेजस धुमाळ यांना पुरस्कार देऊन राज्यमंत्री संजय बनसोडे हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार ॲड त्र्यंबक भिसे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, हभप रामायणाचार्य प्रशांत महाराज,शिवदर्शन फाऊंडेशनचे अध्यक्ष भारत जाधव, प्रा विनोद चव्हाण आदींची उपस्थिती होती.

तेजस धुमाळ यांना यापूर्वी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत युवक महोत्सवात सलग सहा वर्ष तबला वादनात सुवर्णपदक मिळाले आहे. तीन वेळा राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धेत प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. तसेच राष्ट्रीय युवक महोत्सवात त्यांनी दोन वेळा तबला वादनात रोप्य पदक प्राप्त केले आहे. याशिवाय विविध राज्यस्तरीय, विभागीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेत त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत…महाराष्ट्रभर आपल्या तबला वादनाच्या अनेक मैफिलीतून त्यांना श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.

महाराष्ट्रासह, दिल्ली, गोवा,पंजाब ,छत्तीसगड ,कर्नाटक, हरियाणा ओडीसा,राजस्थान,गुजरात अशा अनेक राज्यात तेजस धुमाळ यांनी मैफलीतून तबलावादन केले आहे. सध्या ते लातूर येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल मध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व शिक्षक, मित्रपरिवार व नातेवाईकासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here