मोदीजी पंतप्रधान झाल्यानेच आयोध्येतील
श्रीरामाच्या मंदिर निर्मितीचे स्वप्न पूर्ण झाले
शिवणी येथील अखंड हरिनाम सप्ताहात भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड
लातूर दि. ०३- आयोध्या नगरी प्रभू श्री रामाचे मंदिर व्हावे हे लाखो, करोडो राम भक्ताचे स्वप्न नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान झाले नसते तर पूर्ण होऊ शकले नसते. केवळ मोदीजी यांच्यामुळेच राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले आणि देशभरातील गावागावात] वाडी वस्तीत दिवाळी साजरी झाली असल्याचे भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखवले.

लातूर तालुक्यातील मौजे शिवणी येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि हभप राजाभाऊ महाराज सिंधगावकर यांची भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू असून या आध्यात्मिक सोहळ्यात शुक्रवारी सायंकाळी सहभागी होऊन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी आरती केली आणि उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधला.

आ. रमेशआप्पा कराड यांच्या समवेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, अमोल पाटील, उमेश बेद्रे यांच्यासह बापू चांमले, चेअरमन पंढरीनाथ गुणाले, सरपंच व्यंकटराव सांडूर, शिवाजीराव सुडे, पद्माकर मोगले, व्यंकटराव चामे, उद्धव गायकवाड, हंसराज सांडूर, सोमनाथ वाघमारे, निवृत्ती गुनाले, यशवंत शिंदे, ज्ञानोबा मदे, पद्माकर बरुरे, हरिचंद्र बरुरे इतर अनेक जण होते.

वारकरी संप्रदाय आहे म्हणूनच भारत देश जगात नंबर एक असून संत महात्मे यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. ज्या गावातून आणि परिसरातून टाळ मृदंगाचा आवाज येतो तेथे आत्मिक समाधान मिळते असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, आध्यात्मिक सांप्रदायिक क्षेत्रात महिलांचा मोठा सहभाग आहे, त्यांच्यामुळेच अध्यात्म टिकून आहे. या क्षेत्रात प्रत्येक कुटुंबातली एक तरी व्यक्ती सहभागी झाली पाहिजे असे बोलून दाखवले. यावेळी भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांची संख्या लक्षणीय होती.