18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडीशिवणगीकर मार्गाचे अनावरण

शिवणगीकर मार्गाचे अनावरण

स्वातंत्र्य सैनिक तथा समाजसेवी दिगंबरराव (रावसाहेब) शिवणगीकर मार्ग नामफलकाचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या  हस्ते अनावरण

लातूर, मार्च २


मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या धगधगत्या लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा थोर समाजसेवी दिगंबरराव उपाख्य रावसाहेब शिवणगीकर यांच्या कार्याची स्मृती भावी पिढ्यांपर्यंत निरंतर राहावी, त्यांच्या कार्याची प्रेरणा नवीन पिढीस सदोदित लाभावी या हेतूने लातूर शहर महानगरपालिकेने एकमुखाने घेतलेल्या ठरावानुसार शहरातील महात्मा गांधी चौक ते श्री औसा हनुमान मंदिर या रस्त्याचे  स्वातंत्र्य सैनिक तथा समाजसेवी दिगंबरराव (रावसाहेब) शिवणगीकर मार्ग असे नामकरण करण्यात आले असून या नवीन मार्गाच्या नामकरण नामफलकाचे अनावरण माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शुभहस्ते खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीचा पावन मुहूर्तावर, मंगळवारी सायंकाळी गांधी चौकात करण्यात आले.


या अनावरण सोहळ्याला भाजपा लातूर शहर विधानसभा नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री शैलेश भैय्या लाहोटी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री गुरुनाथ मगे, गटनेते श्री शैलेश गोजमगुंडे , स्थायी समिती सभापती श्री दिपक मठपती, प्रभाग क्र ८ चे नगरसेवक  श्री शैलेश स्वामी , श्री व्यंकट वाघमारे, सौ जान्हवी ताई व श्री मनोज सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रत्येक व्यक्ती सामाजिक ऋण घेऊन जन्मास येतो, त्याची परतफेड करणे हे आद्य कर्तव्यच. हे कर्तव्य बजावत असताना समाजावर निस्वार्थ प्रेम करणे, समजाप्रती समर्पित होऊन शरीराचा कण कण खर्च करणे हे कर्मयोग्याचे प्रमुख लक्षण, हे कर्मयोगी सामाजिक कर्तव्याप्रती निरंतर प्रेरणा देत राहतात आणि यांचे भान देखील नवीन पिढी आनंदाने जपते व प्रेरित होऊन अधिकाधिक समर्पित होते.

अत्युच्च सामाजिक भावनेतून तथा स्वातंत्र्य सैनिकांच्या, अथक परिश्रम व त्यागातून आजचे लातूर एक सर्वार्थाने भूषण शहर म्हणून उदयास आले आहे. म्हणूनच लातूर ही कर्मयोग्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. असंख्य कर्मयोगी, स्वातंत्र्य सेनानी, सामाजिक विभुतीनी ओतप्रोत हे शहर अद्वितीय आहे. असेच लातूर शहरातील कर्मयोगी, मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील अग्रणी, लातूर आर्य समाजाचे संस्थापक तथा आर्य सत्याग्रह १९३८, महाराष्ट्र द्वितीय परिषद आदी पहिल्या फळीतील नेतृत्व, कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध शिक्षण संकुल, गोरक्षण, सेंट्रल बँक ऑफ इंडिया लातूर शाखा, स्थापनेत अग्रणी असलेले तसेच शहराच्या पहिल्या पाणी पुरवठा योजनेसह भौतिक सुविधांप्रती आग्रही भूमिका घेणारे, पहिल्या नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकरी संचालक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा थोर समाजसेवी दिगंबरराव उपाख्य रावसाहेब शिवणगीकर यांच्या कामगिरीची स्मृती निरंतर राहावी, या कार्याची प्रेरणा नवीन पिढीस सदोदित लाभावी या हेतूने लातूर शहर महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी एकमुखाने शहरातील महात्मा गांधी चौक ते श्री औसा हनुमान मंदिर या रस्त्याचे नामकरण स्वातंत्र्य सैनिक तथा समाजसेवी दिगंबरराव (रावसाहेब) शिवणगीकर मार्ग असे करण्याचा ठराव मंजूर केला होता. या अनुषंगाने या मार्गाचे अनावरण मंगळवारी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.


यावेळी माननीय नगरसेवक श्री सुनील मलवाड, सौ शितलताई व श्री विनोद मालू, श्री संगीत रंदाळे , सौ स्वाती ताई घोरपडे , सौ श्वेता ताई लोंढे , सौ शोभाताई पाटील  यांच्यासह शहरातील मान्यवर श्री अतुल ठोंबरे , श्री उदय चौंडे , श्री मनीष बंडेवार, श्री नागेश कानडे,  प्रविण येळे , श्री बाबुआप्पा सोलापुरे , श्री बंडप्पा जवळे , श्री दिग्विजय काथवटे, श्री युवराज लोखंडे , श्री सुनील निलंगेकर , श्री रविकांत मार्कंडेय, श्री धीरज खुब्बा, श्री प्रविण सावंत, श्री शिवराज लोखंडे , श्री आनंद गेलडा , श्री ललित तोष्णीवाल, श्री सुनील राठी, डॉ गिरीश कुलकर्णी जी, श्री दत्ता कुलकर्णी, श्री शशिकांत कानडे, श्री विलास गोंदकर , श्री गणेश बर्गले , श्री शुभम चाकोते, श्री आशिष साठे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा श्री विनोद चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी शिवणगीकर परिवाराच्या वतीने उपस्थित प्रमुख माण्यावरांचे, शहर महानगपालिकेचे सर्व आजी, माजी सदस्य, अधिकाऱ्यांचे आभार मानन्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  श्री संतोष तिवारी, श्री जयकिरण परदेशी, श्री आशिष बनसोडे, श्री प्रकाश जकोटिया, श्री शैलेंद्र डावळे , श्री संदीप केंद्रे, श्री माधव जोशी , श्री अमोल देशमुख जी, श्री विवेक डोंगरे, श्री अनिल कांबळे , श्री विकास बनसुडे यांच्या सह अनेकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]