थोरामोठ्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी व नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने जयंती मोहत्सव सामाजिक उपक्रम राबवून करावी असे प्रतिपादन- भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-
दिनांक १६ रोजी संत शिरोमनी गुरू रविदास सार्वजनिक जयंती मोहत्सव कार्यक्रमात ते अध्यक्षीय समारोपात बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून प्रा.डॉ.आर.डी.कांबळे,नवनाथ कांबळे ,ज्योतिराम कांबळे,डॉ एस.एस.शिंदे,बाळासाहेब शिंगाडे,मनोज कोळ्ळे,माधव लांडगे,विनायक वाघमारे,ईस्माइल लदाफ,शेषराव ममाळे,रोहित बनसोडे,दयानंद चोपणे अदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले माणसाने विचाराने अल्पसंख्याक असू नये तर महामानवाच्या विचारावर मार्गक्रमन करत रहावे घराबाहेर पडल्यानंतर अनेक अडथळे आव्हाने स्वीकारून आपली प्रगती करणे हेच खरे महामानवांचे विचार आहेत.जयंती मोहत्सावात नशेच्या धुंदित नाचण्यापेक्षा महापुरूषांच्या विचारांच्या धुंदित असावे व चर्मकार समाजाच्या प्रत्येक अडचणीत मी खांद्याला खांदा लावून आपल्या संघर्षात सदैव सोबत आहे.असा विस्वास निलंगेकर यानी दिला.संत रविदास महाराज यांचे निलंगा शहरात भव्य मंदिर व सभागृह उभा करून शहराच्या सौंदर्यात भर घालू व त्यांचे विचार नव्या पिढीला प्रेरणादायी असतील शहरात देवालय उभा करू असे अश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक कवि माधव लांडगे तर सुञसंचलन भिवाजी लखनगावे व बालाजी जाधव यानी तर आभार रनविर भालके यानी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहू चित्ते रमेश सातपुते तुषार सोमवंशी धनाजी जाधव,अमोल जाधव,गंगाधर भालके,भागवत जाधव ,भरत वाघमारे,काशीनाथ जाधव,विठ्ठल कांबळे,शिवाजी वाघमारे,नागोराव वाघमारे,उध्दव कांबळे,भिवाजी मिरखले,महेश जाधव,संतोष जाधव,अरूण पिंपळे,ज्ञानेश्वर जाधव,सतीश जाधव,अदीने परिश्रम घेतले.