निलंगा-(प्रतिनिधी)-निलंगा येथे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ” मी जिजाऊ बोलते ” हे व्याख्यानपुष्पाचे आयोजन करण्यात आले आहे.या व्याख्यानाला प्रमुख व्याख्याते सौ.नंदाताई पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्ह्याच्या माजी खा.श्रीमती रूपाताई ( अक्का ) पाटील निलंगेकर उपस्थित राहणार आहेत.
या व्याख्यानाचे उद्रघाटन उपविभागीय अधिकारी शोभाताई जाधव यांच्या हस्ते होणार आहे.सौ.डाॅ.गीताताई देशमुख,सौ.सरस्वतीताई नागमोडे,सौ.अर्चनाताई जाधव,सौ.कविताताई तोष्णीवाल,सौ.उर्मिलाताई माने,सौ.राजश्रीताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
निलंगा येथे शिवजयंती निमित्ताने “मी जिजाऊ बोलते”यावर व्याख्यान दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृृृतिक सभागृहात (टाऊन हाॅल)येथे होणार आहे.तरी या व्याख्यानाला महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजयंती समितीकडून करण्यात आले आहे.