निलंगा,-(प्रतिनिधी)-
शहरातील महा विकास आघाडी विविध सामाजिक संघटना व सर्वधर्म याच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाउत्सवासारखी साजरी करण्यासाठी आज निलंग्यातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात बैठक संपन्न झाली
आज निलंगा शहरातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात महाविकासआघाडी विविध संघटना पदाधिकारी व सर्वधर्मीय पुढाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण रयतेला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्यासोबत अठरापगड जातीचे मावळे होते यामुळे या अठरापगड जातींच्या व सर्व धर्मीयांच्या योगदानातून अशा या जाणत्या राजाची जयंती महाउत्सवासारखी साजरी झाली पाहिजे असे सर्वानुमते ठरवण्यात आले आज झालेल्या प्राथमिक बैठकीमध्ये छत्रपतींचा इतिहास घराघरात पोहोचला पाहिजे यासाठी 18फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून घरोघरी गोविंद पानसरे लिखित ‘ शिवाजी कोण होताहोता ‘ या पुस्तकांच्या प्रती वाटप करण्यात येतील 19 फेब्रुवारी रोजी सकाळी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास समितीच्या वतीने अभिवादन करण्यात येईल सायंकाळी चार वाजता निलंगा शहरातील हुतात्मा स्मारकामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून विविध देखावे पालखी मेने ढोल ताशा जहाज पथके सह अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात येईल व सायंकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जवळ भव्य दिव्य दिव्यांच्या रोषणाईत मशाली सह शिवबांचा जन्मोत्सव पाळणा कार्यक्रम संपन्न होईल व मोठ्या प्रमाणात अतिषबाजी करून जन्मोत्सव साजरा करण्यात येईल अशा विविध उपक्रमाने शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठीच्या बैठकीसाठी आज काँग्रेसचे नेते अभय साळुंके विजयकुमार पाटील प्रा राजेंद्र सूर्यवंशी हमीद शेख अजित माने अविनाश रेशमे दयानंद चोपणे इस्माईल लदाफ सुधाकर पाटील हरिभाऊ सगरे नारायण सोमवंशी ईश्वर पाटील विलास सुर्यवंशी प्रा रोहित बनसोडे मुजीब सौदागर दत्ता मोहोळकर मुस्तफा शेख सुनील नाईकवाडे धम्मानंद काळे शिवाजी पांढरे विजय कुमार सूर्यवंशी अमोल सोनकांबळे देवदत्त सूर्यवंशी गिरीश पात्रे राणा आर्य रामलिंग पडसाळगे गोविंद सूर्यवंशी हुसेन शेख आदी शिवप्रेमी बांधव या वेळी उपस्थित होते यावेळी विविध कमिट्या करून बाबदार्या वाटून देण्यासाठी उद्या सायंकाळी सहा वाजता जिजाऊ सृष्टी निलंगा येथे अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे