भावपूर्ण श्रद्धांजली
शिवकुमार शर्मा यांचा जन्म जम्मू येथे झाला असून त्यांची मातृभाषा डोग्री आहे. १९९९ साली त्यांनी रेडिफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांच्या वडिलांनी त्यांना केवळ पाच वर्षांचे असल्यापासून शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला आरंभ केला. त्यांच्या आई उमा दत्त शर्मा (गायिका) यांनी सखोल अभ्यास करून ठरवले की शिवकुमार यांनी भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर वाजवणारे भारतातील पहिले वादक बनावे. म्हणून मग त्यांच्या इच्छेनुसार, शिव कुमार यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि उमा दत्त शर्मा यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. त्यांनी आपल्या वादनकौशल्याचे पहिले सादरीकरण १९५५मध्ये मुंबई येथे केले.
सुरुवातीची काही वर्षे कंठगायन केल्यानंतर शिवकुमार शर्मा हे संतूरवादनाकडे वळले. संतूर या वाद्याला लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. आता शिव कुमार शर्मा म्हटले की संतूर वादक असेच मनात येते. १९५६ साली शांताराम यांच्या “झनक झनक पायल बाजे” गाण्यास त्यांनी संगीत दिले. १९६० साली त्यांनी स्वतःचा एकल गीतसंच प्रसिद्ध केला.
जागतिक कीर्तीचे संतूरवादक पंडित #शिवकुमारशर्मा यांचे आज (१० मे २०२२) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
#शिवकुमारशर्मा यांचा अल्पपरिचय.
जन्म. १३ जानेवारी १९३८ जम्मू येथे.
शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांनी त्यांना केवळ पाच वर्षांचे असल्यापासून शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला आरंभ केला. त्यांच्या आई गायिका उमा दत्त शर्मा यांनी सखोल अभ्यास करून ठरवले की शिवकुमार यांनी भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर वाजवणारे भारतातील पहिले वादक बनावे. त्यांच्या इच्छेनुसार, शिव कुमार यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि उमा दत्त शर्मा यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. त्यांनी आपल्या वादनकौशल्याचे पहिले सादरीकरण १९५५ मध्ये मुंबई येथे केले. संतूर या वाद्याला लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. आता शिव कुमार शर्मा म्हटले की संतूर वादक असेच मनात येते. १९५६ साली शांताराम यांच्या “झनक झनक पायल बाजे” गाण्यास त्यांनी संगीत दिले. १९६० साली त्यांनी स्वतःचा एकल गीतसंच प्रसिद्ध केला. १९६७ साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत “कॉल ऑफ द व्हॅली” ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीने त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिले आहे. त्याची सुरुवात १९८० साली “सिलसिला” चित्रपटापासून झाली. या काळात या जोडगोळीने “शिव-हरी” या नावाने संगीत दिले होते. त्यांनी फासले, चाँदनी, लम्हे, डर या चित्रपटांना सुद्धा संगीत दिले. त्यांचा मुलगा राहुल हासुद्धा संतूर वादक असून १९९६ पासून तो शिवकुमारांना साथ करतो आहे. शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनाची सुरूवात संथ आलापचारीने होते. ती ध्रुपद अंगाची असल्याने मुर्की, खटका वगैरे प्रकार वर्ज्य असतात. नंतर जोड अंगाचे वादन ते करतात. यात पूर्णपणे तालबद्ध नसले तरी लयीच्या अंगाने रागस्वरूप उलगडत जाणारे वादन असते. सांगता अत्यंत वेगवान लयीतल्या झाल्याने होते. त्यानंतर तबल्याच्या साथीने विलंबीत किंवा मध्य लयीतली गत आणि शेवटी द्रुतगतीतली गत असा वादनाचा क्रम असतो. कारकीर्दीच्या सुरूवातीला मसीतखानी आणि रजाखानी अंगाने त्रितालातल्या गती वाजवणार्या शिवकुमार शर्मांनी पुढे रूपक, झपताल, एकताल यासारखे प्रचलित ताल तसेच मत्त ताल (९ मात्रा), रूद्र ताल (११ मात्रा), जय ताल (१३ मात्रा) आणि पंचम सवारी (१५ मात्रा) अशा तालांमधेही तितक्याच सहजतेने वादन केलेले दिसते. पिलू, पहाडीसारख्या रागांवर आधारलेल्या धुन तसेच लोकसंगीतावर आधारलेल्या धुन वाजवण्यात कौशल्य मिळवलेले शिवकुमार शर्मां यांच्या तोडीचे वादक कलाकार मोजकेच असतील. शिवकुमारांचे संतूर वादन सर्वार्थाने समृद्ध असते. ज्यांना संगीतातल्या तांत्रिक बाबी समजत नाहीत, अशांना संतूरमधून प्रकटणाऱ्या नादमाधुर्याचा, भाव आणि नवरसांच्या उत्कट अभिव्यक्तीचा आस्वाद घेता येतो. एखादे तरल भावचित्र मनात साकार व्हावे, किंवा खळाळता झरा, समुद्रात उसळाणार्याक लाटा किंवा स्तब्ध उभ्या असलेल्या हिमशिखराचे चित्र डोळ्यापुढे उभे रहावे इतके परिणामकारक रागस्वरूप शिवजी सहज उभे करत. त्यांचा ललत ऐकताना भल्या पहाटे शुचिर्भूत होउन मंदिरात ध्यानस्थ बसल्याची जाणिव होते, रागेश्री ऐकताना मिलनासाठी अतुर झालेली सुंदर अभिसारिका डोळ्यापुढे येते, मारवा अनाम हुरहुर लावून जातो तर श्री ऐकताना हृद्यस्थ जनार्दनाला शरण गेल्याची भावस्थिती प्रत्ययाला येते. आजमितीला संतूर आणि शिवकुमार शर्मा हे जणू समानार्थी शब्द झालेले आहेत. संतूरला अभिजात संगीताच्या व्यासपीठावर सतार, सारंगी किंवा सरोदच्या तोलामोलाचे स्थान मिळालेले आहे. पं. शिवकुमार शर्मांना पद्मविभूषणसह देशोदेशींचे सन्मान, पुरस्कार मिळालेले आहेत.
पं.शिवकुमार शर्मा यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे `पं. शिवकुमार शर्मा द मॅन अँड हिज म्युझिक’ या अनोख्या कॉफी-टेबल बुक अनेक दुर्मीळ प्रकाशचित्रांनी हे पुस्तक सजले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे.
पं. शिवकुमार शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
१९६७ साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत “कॉल ऑफ द व्हॅली” ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. ती कालांतराने खूपच प्रसिद्ध झाली. हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीने त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिले आहे. त्याची सुरुवात १९८० साली “सिलसिला” चित्रपटापासून झाली. या काळात या जोडगोळीने “शिव-हरी” या नावाने संगीत दिले होते. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट हे: फासले (१९८५), चाँदनी (१९८९), लम्हे (१९९१), डर (१९९३).